शेवगाव – शेवगाव-नेवासा तोडलसगत सागर लॉजवर रात्री कुंटणखानावर जिल्हा पोलिस प्रमुखांच्या विशेष पथकाने छापा टाकून तीन पुरुष व दोन परप्रांतीय महिलांना पकडण्यात आले.याबाबत समजलेली माहिती अशी की, शेवगाव ते नेवासा जाणारे रोडवरील सागर लॉजमध्ये सुरू असलेल्या कुंटणखानामध्ये जिल्हा पोलिस प्रमुखांच्या विशेष पथकाने शनिवारी (दि.२१) रात्री छापा टाकून तीन पुरुष व दोन परप्रांतीय महिलांना रंगेहात पकडले. अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधि नियम सन १९५६ चे कलम ३,४,५ प्रमाणे शेवगाव पोलिस ठाण्यात सामाजिक सेवक संदेश किसन जोगेराव व्यवसाय (रा. साळुंके विहार पुणे ता. जि. पुणे) यांच्या फिर्यादीनुसार सचिन रूपचंद मुसावत (रा. शेवगाव ता. शेवगाव), संदीप माणिक शेळके (रा. रामनगर नेवासा रोड ता. शेवगाव), अमर अश्पाक शेख (रा,पिंगेवाडी तालुका शेवगाव ) व महिला यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. यातील आरोपी हे स्वतःचे फायदा करिता कुंटणखाना चालवून आपसात संगनमत करून त्यावर मिळणाऱ्या पैशावर आपली उपजीविका भागवून पीडित मुलींना अवैध वेश्या व्यवसाय करण्यासाठी त्यांना कुंटणखाण्यामध्ये अडकवून वेश्या गमना करिता प्रवृत्त करून त्यांना गिऱ्हाईकांना दाखवून अवैधरित्या कुंटणखाना चालविताना मिळून आलेवरुन शेवगाव पोलीस ठाण्यात गु.र.न. व कलम -५१०/२०२१ भा.द.वि.कलम ३७०(३) सह स्त्रीया व मुली यांचे अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधि नियम सन १९५६ चे कलम ३,४,५ प्रमाणे रविवार (दि २२) दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलींना सुधारगृहात पाठविण्यात आले. घटनास्थळी पो. नि. प्रभाकर पाटील यांनी भेट दिली. पुढील तपास सपोनि ठाकरे हे करीत आहेत.
ताजी बातमी
सुप्रीम कोर्ट चे मुख्य न्यायाधीश गवई यांच्यावर वकिलाकडून बुटफेक..
सोमवारी सर्वोच्च न्यायालयात एका वकिलाने सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर एका...
शिरूर येथे काही समाज कंटकाकडून अल्पसंख्याक समाजातील तरुणाची राहत्या घरी जाऊन धारदार शस्त्राने हल्ला...
सदर तरुण मूळचे नांदेड येथील असून कामानिमित्त रांजणगाव एमआयडीसीत वास्तव्यास होते. गाडीचा कट लागल्या मुळे मनात राग...
‘माझ्या नादी लागू नका, अन्यथा तुमच्यामुळे अजित पवारांचाही कार्यक्रम लावेन’, मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंना...
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण का घ्यायचंय? याबाबत धनंजय मुंडे यांनी दसरा मेळाव्यात सवाल उपस्थित केले होते. या...
चर्चेत असलेला विषय
2023 च्या अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या उपाययोजनांमुळे भारताच्या निर्यातीला चालना मिळेल
केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 मध्ये तंत्रज्ञान-केंद्रित क्षेत्रांवर भर देऊन उत्पादनाला चालना देण्यावर आणि अनेक नवीन आणि उदयोन्मुख संधींच्या...
आधी अपात्र नंतर पात्र ठरलेले स्विकृत नगरसेवकांना खंडपीठाची नोटीस : 13 जुलैला होणार सुनावणी
दि.17 जुन 2021
आधी अपात्र नंतर पात्र ठरलेले स्विकृत नगरसेवकांना खंडपीठाची नोटीस : 13 जुलैला होणार सुनावणी
Bhajan movement : रस्त्याच्या कामासाठी नागरिकांचे भजन आंदोलन
Bhajan movement : श्रीगोंदा : जग चंद्रावर तसेच मंगळावर गेले तरी आपण अजून रस्त्यांसाठी आंदोलने करत असल्याने आपण...
आज भिंगार मध्ये गणपती विसर्जन
नगर दि 17 प्रतिनिधी:
शहरातील भिगार येथे प्रथे प्रमाणे आज दि 17 रोजी गणपती विसर्जन होणार आहे.याची तयारी पूर्ण...