
शेवगाव – या बाबत सविस्तर वृत्त असे की रोटरी क्लब ऑफ शेवगाव सिटीच्या नुतन पदाधिका-यांचा पदग्रहण समारंभ रोटरीचे अहिल्यानगर चे उप प्रांतपाल ईश्वर बोरा व कत्थकथानकार डॉ. संजय कळमकर यांच्या हस्ते शनिवार ता. २५ रोजी सायंकाळी ममता लॉन्स येथे पार पडला. रोटरीचे संस्थापक पॉल हॅरिस यांची प्रतिमापूजन व दीप प्रज्वनाने कार्यक्रमाला सुरवात झाली. यावेळी रेणुका माता मल्टीस्टेटचे संस्थापक डॉ. प्रशांत उर्फ नाना भालेराव, शेवगांवचे भूमिपुत्र तहसिलदार संतोष काकडे, शेवगाच्या रोटरी क्लब चे संस्थापक अध्यक्ष तथा सह प्रांतपाल डॉ. संजय लड्डा, माजी अध्यक्ष मनिष बाहेती, डॉ. भागनाथ काटे, आदी प्रमुख उपस्थित होते. यावेळी संजय कळमकर म्हणाले की, समाज व राष्ट्राचे ऋण फेडण्यासाठी रोटरी क्लब हे सर्वोत्कृष्ट व्यासपीठ आहे. प्रत्येक व्यक्तीवर मातृभुमी, आई- वडील, गुरू, व समाजाचे ऋण असते. समाजाचे प्रश्न समजून घेण्यात व ते सोडविण्याचा प्रयत्न मनमुराद आनंद मिळतो. यावेळी ईश्वर बोरा म्हणाले की, रोटरी क्लब या संस्थेचे कार्य जगभरात असून ३५ हजार क्लब व १५ लाखाच्यावर सदस्य आहेत. मित्रत्व व समाजसेवा भावनेने रोटरीच्या कार्याची वाटचाल सुरू आहे.आरोग्य, पर्यावरण, साक्षरता यासह अनेक क्षेत्रात रोटरीने योगदान दिले आहे. मावळते अध्यक्ष प्रा. काकासाहेब लांडे यांनी नुतन अध्यक्ष युसुफखान पठाण यांच्याकडे तर मावळते सेक्रेटरी वसीम शेख यांनी नुतन सेक्रेटरी त्यानंतर ग्रेटरी क्लब ऑफ शेवगाव सिटी, विजयकुमार मुधोळकर यांच्याकडे पदाची सुत्रे प्रदान केली. यावेळी लंडन येथील आदर्श उदयोजक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल डॉ. प्रशांत भालेराव व राज्यात महसुल खात्यात जिवंत सातबारा हि अनोखी संकल्पना राबवणारे तहसिलदार संतोष काकडे यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. नुतन अध्यक्ष युसुफखान पठाण यांनी या वर्षी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची तर मावळते अध्यक्ष काकासाहेब लांडे यांनी गतवर्षी राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती दिली. यावेळी डॉ. सुरेश पाटेकर, हरिष भारदे, डॉ. दिनेश राठी, डॉ. मनीषा लड्डा, बाळासाहेब चौधरी, डॉ. पुरुषोत्तम बिहाणी, डॉ. विकास बेडके, डॉ. मयूर लांडे, अँड. अभिजीत काकडे, डॉ. सुयोग बाहेती, इरफान पटेल, रिजवान शेख, आयुब पठाण, शब्बीर शेख, सय्यद अली सय्यद, फिरोज पठाण, प्रविण लाहोटी, वसीम मुजावर, वल्लभ लोहीया, सुधाकर जावळे यांच्यासह श्रीमती स्नेहलता लबडे या जेष्ठ रोटेरियन, गोविंदा ग्रुप सदस्य व गुडमोर्निंग ग्रुप चे अध्यक्ष शब्बीर शेख ममता लॉन्स चे संचालक उपस्थित होते. रोटरी क्लबवर प्रेम करणारे नागरिक इनरव्हील महिला क्लब च्या सदस्य आदी उपस्थित होते. माजी प्राचार्य दिलीपराव फलके यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. गजानन लोढे यांनी आभार मानले.





