
शेवगांव शहरात चोरांनी लाज सोडली आखेगांव रोड परिसरातील श्रीमती. सुनंदा खापरे यांच्या मालकीची गाय सोडुन नेली
{ अविनाश देशमुख शेवगांव }
या बाबतीत सविस्तर वृत्त असे की शेवगांव शहरतील
सुनंदा खापरे यांच्या मालकीची ताजी व्यालेली गाय काल रात्री दिनांक 25 /8/ 2023 शुक्रवार रोजी रात्री साडेदहा वाजता शेवगाव येथील आखेगाव रोडवरील त्यांच्या राहत्या घरासमोरील पटांगणातून चोरीला गेलेली आहे. विशेष म्हणजे यां गाईचे चार दिवसांचे वासरू तिथेच सोडुन दिले आहे याबाबत पोलीस स्टेशन मध्ये आज सकाळी चोरीचा गुन्हा नोंदवला आहे. यां उलट्या काळजाच्या चोरांनी या गाईला चार दिवसाचे वासरू आहे याची सुद्धा किंव केली नाही कालरात्री पासुन ते चार दिवसांचे वासरू त्याच्या आईच्या शोधात हंबरडा फोडुन ओरडूनच ओरडून जीव कासावीस करीत आहे. जर कोणाला सदर गाईचा शोध अथवा तपास आपल्याला व माहिती मिळाल्यास खालील नंबरवर संपर्क करणे माहिती देणारांचे नाव गोपनीय ठेवले जाईल 84 59 78 0 328, 99 22 59 60 46
ताजा कलम
शेवगांव शहरामध्ये अनेक गो रक्षक आपली ऐपत नसताना गोरक्षणार्थ आपल्या घरासमरील मोकळ्या जागेत गाय वासरू बांधत आहेत. परंतु नरक्या चोरांची तिथेही वाकडी नजर पडली यां घटनेची परीसरात आणि संपुर्ण शहरात हळहळ व्यक्त होत आहे. अलीकडे शहरात आणि तालुक्यात मंदिराच्या दान पेटयां देवाचे सोने नाणे गाई गुर अश्या चोर्यांमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे एकीकडे शहरात शेकडो मोकाट जनावरे राजरोस फीरत असतात त्यांना “घार खाईना आणि गिधाड हि नेईना” आणी इथे घरा समोरून हजरो रुपये किमतीची गावरान गाय सोडुन नेली
अविनाश देशमुख शेवगांव
सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार