
शेवगांव शहरातील आकाश लक्ष्मण कडमींचे वय 19 रा. रामनगर लांडेवस्ती रोड शेवगांव येथुन हा युवक गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता आपल्या राहत्या घरातून बेपत्ता होता. त्याचा मृतदेह आज सायंकाळी ठाकूर पिंपळगाव परिसरात संशयास्पद परिस्थितीत आढळला त्याच्या नातेवाईकांनी त्याच्याबरोबर घातपात झाल्याची शक्यता शेवगांव पोलिसांकडे व्यक्त केली आहे पोलीस स्टेशन शेवगांव येथे गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु असुन युवकाचा मृतदेह पोस्टमार्टम साठी ग्रामीण रुग्णालय शेवगांव येथे पाठविण्यात आला आहे




