
शेवगांव नगरपरिषदेचे घण कचऱ्याचे टेंडर संपल्याने व नगरपरिषदेकडच्या नवीन खरेदी केलेल्या घंटा गाड्या { कचरा वाहतुक करणारे } वाहनांचे पासिंग आणि अपुरे चालक असल्याने शेवगांव शहरात ऐन पावसाळ्यात जागोजागी घण कचरा उकांडे तयार झाले आहेत तो आता पार रस्त्यावर यायला लागला आहे आणि पालिकेच्या उघड्या चेंबर मधुन तो बंदिस्त नालीत जात आहे निकृष्ट दर्जाच्या अनेक बंदिस्त गटार चे चेंबर गायब आहेत त्याची देखभाल दुरुस्ती होणे गरजेचे आहे त्यातून अनेक निशाचर लोकांच्या पार घरात शिरत आहेत मुख्या बाजारपेठेतील गटारीवर अनेक दुकानदारांनी पथारी मांडल्याने नगरपरिषद शेवगांव ने ती गटार यंदा काढलीच नाही ती गटार शोधुन देणाऱ्यास एक हजार रुपयांचे बक्षीस “मी शेवगांवकर” संघटना देणार आहे यां संधर्भात नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सचिन राऊत आणि अभियंता प्रशांत सोनटक्के याना वारंवार लेखी आणि तोंडी तक्रार करूनही ते उडवाउडवीची उत्तरे देतात जागोजागी साचलेला कचरा उकांडे शेवगांव शहरातील आबालवृद्धांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे शहरातील अनेक जुन्या जाणत्या लोकांनी नागरपरिषदे मध्ये लक्ष घालणे बंद केल्याने व अनेक जुने कर्मचारी निवृत्त झाल्याने कोणतं वासरू कोणत्या गाईला पितय ते काळानं शहरवासीयांनी समस्या नेमक्या कोणाला सांगायच्या हा सुद्धा प्रश्न आहे

नगरपरिषद शेवगांवच्या मगरसेवकांची मुदत फेब्रुवारी 2020 मध्ये संपली आहे त्यानंतर सगळा कारभार प्रशासक आणि मुख्यधिकारी पाहत आहेत त्यांना जाब विचारणारे सभागृह अस्तित्वात नसल्याने विकास कामांचा खोळंबा झाला आहे शहरातील अनेक स्ट्रीट लाईट गेली कित्येक महिने बंद आहेत शहरातील अनेक चौकात हैमॅक्स चे खांब विना दिव्याचे दोन महिन्यांपासून नुसतेच उभे केले आहेत
क्रमशः
शेवगांव नगरपरिषदेचा कारभार ‘आंधळं दळतंय आणि कुत्र पीठ खातंय” असा झाला आहे अनेक टेंडर संपले आहेत त्यामुळे बाजार वसुली घनकचरा नियोजित पाणी योजना रखडल्या आहेत नगरपरिषद कार्यालय शहरापासून कोसो दूर असल्याने तिकडे कोणी फिरकत पण नाही
प्रतिनिधी
अविनाश देशमुख शेवगांव
महा 24 न्यूज
अहमदनगर महाराष्ट्र
