शेवगांव शहराचा पाणी प्रश्न चिघळला महिलांचे शोले स्टाईल आंदोलन पाण्याच्या टाकीवर चालून गेल्या महिला मुख्याधिकारी निरुत्तर

    165

    शेवगांव शहराचा पाणी प्रश्न चिघळला महिलांचे शोले स्टाईल आंदोलन पाण्याच्या टाकीवर चालून गेल्या महिला मुख्याधिकारी निरुत्तर

    { अविनाश देशमुख शेवगांव } 9960051755

    शेवगाव प्रतिनिधी 05/12/2023
    याबाबत सविस्तर वृत्त असे की सुमारे ५० हजारावर लोकवस्ती असलेल्या शेवगाव शहरात किमान दिवसाआड पाणी पुरवठ करण्यात यावा तसेच शहरासाठी नव्याने मंजूर करण्यात आलेल्या स्वतंत्र पाणी पुरवठा योजनेच्या कामाला तातडीने सुर वात करण्यात यावी या मागणीच्या पाठ पुराव्या साठी शहरातील विविध प्रभागातील महिला कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलनाच्या माध्यमातून नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्यावर विविध प्रश्नांचा भडीमार केला जायकवाडी जलाशयाच्या दहिफळ जॅकवेल वरून शेवगाव व पाथर्डी शहरासह दोन्ही तालुक्यातील ५४ गावांना पाणी पुरवठा होतो . मात्र शेवगाव शहरात कधी १२ तर कधी १५ दिवसांनी पाणी पुरवठा होत असल्याने तसेच नगरपरिषद वर्षाची पाणीपट्टी वसूल करत असल्याने शेवगावकरावर हा जाणीवपूर्वक अन्याय कशासाठी ? असा निरुतर करणारा सवाल आंदोलक महिलांनी व्यक्त केला . शहरातील पाण्याची पाईप लाईन जीर्ण झाली असल्याने सतत दूषीत पाणी पुरवठा होतो. त्यामुळे जास्त दिवस पिण्याचे पाणी साठवून ठेवावे लागते. अनेकदा पाण्यात आळ्याचा प्रादूर्भ।व होऊन साथीचे आजार उद्भवले आहेत . पाणी टंचाईच्या समस्यांचा महिलांना आधिक सामना करावा लागतो. त्यामुळे महिला कृती समितीच्या माध्यमातून आवाज उठविण्यात आल्याचे सांगण्यात आले . यावेळी उपस्थित महिलानी केलेल्या जोरदार घोषणा बाजीने परिसर दणाणून गेला .
    मुख्याधिकारी सचिन राऊत यांनी महिलांच्या रोषाला सामोरे जात म्हणाले की, शहरासाठी प्रतिदिनी ७० ते ७५ लक्ष लिटर पाण्याची आवश्यकता असून सध्या पाण्याची कमी आवक होत असल्याने पाणीपुरवठा विलंबाने होत आहे तसेच वीज पुरवठा खंडित होत असल्याने पूर्ण क्षमतेने वीज पुरवणा झाल्यास पाणी पुरवठ्यात सातत्य राखले जाईल असे सागितले .
    यावेळी काही संतप्त महिलांनी नळाला येणारे गाळ मिश्रीत पाणी मुख्याधिकार्‍यावर फेकण्याचा प्रयत्न केला . यावेळी संयोजक महिलानी त्यांना आवरले
    या वेळी स्नेहल फुदे, सिमा बोरुडे, वीना नांगरे, सुनिता काथवटे, गिता बाहेती, शोभा शिनगारे, उषा काथवटे, बालीका फुंदे, शुभांगी मुळे, बबीता मगर, प्रतिभा नाईक शारदा सोनवणे, वैशाली बडधे, कल्पना घोलप , हिराबाई शिंदे , सुरेखा जाधव, शिवकन्या बोरुडे , मनिषा खेडकर, प्रतिभा राऊत, मीना काथवटे , यमुना शिंदे, सविता घनवट आदिसह महिलांची उपस्थिती होती .
    महिला पोलिस नाईक संगिता पालवे, शितल गुंजाळ यांनी चोख बंदोबस्त ठेवला .

    ताजा कलम

    शेवगाच्या गंभीर पाणी प्रश्नावर रखडलेल्या नवीन पाणी योजनेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तहसीलदारांना निवेदन मनसेचा हंडा मोर्चा पाणी प्रश्नावर नगरपालिका प्रशासन विद्यमान आमदार यांची झाली कोंडी कोट्यावधी रुपये आणून सुद्धा सहा महिने झाले तरी वर्क ऑर्डर नाही मुबलकपाणी शहरात येऊ नाही 45 खेड्यांचे शेपूट जोड़ल्यामुळे खेड्यांना तीन दिवसाला आणि शहराला बारा दिवसाला पाणी देतोय कोण???

    अविनाश देशमुख शेवगांव
    सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here