!!! शेवगांव तालुक्यात अमन शाकीर शेख या अल्पवयीन मुलास विहिरीत ढकलुन जीवे मारणाऱ्याच्या शेवगांव पोलिसांनी आवळल्या मुसक्या !!!

    153

    !!! दहीफळ-घोटण जाणाऱ्या रस्त्याने रनिंग करीत असतांना अल्पवयीन मुलाला विहीरीत फेकुन देवुन जिवे ठार मारुन फरार झालेल्या आरोपीला शेवगाव पोलीसांनी केले 24 तासा मध्ये गजाआड !!!

    या बाबत सविस्तर वृत्त असे कि दि.21/05/2025 रोजी सायं 06.30 वाजेच्या सुमारास या गुन्ह्यातील मयत अमन शाकीर शेख वय-10 वर्षे तसेच तोफीक सुभान शेख दोघे रा. जुने दहीफळ ता. शेवगाव हे गावातील दहीफळ-घोटण जाणाऱ्या रस्त्याने रनिंग करीत असतांना यातील आरोपी नामे सचिन गोरख भारस्कर रा. जुने दहीफळ ता. शेवगाव व पिनु गंगाराम भारस्कर रा.सदर हे पायी चालत असतांना अमन शाकीर शेख याचा पाय घसरुन सचिन गोरख भारस्कर याचे अंगावर पडल्याने त्याचा त्याला राग येवुन त्याने अमन शेख यास मारहाण करुन रस्त्याचे कडेला असलेल्या विहीरीमध्ये उचलुन फेकुन देवुन जिवे ठार मारले आहे. यातील फिर्यादी बीबी गुलाब शेख वय-65 रा. जुने दहीफळ ता. शेवगाव जि. अहिल्यानगर यांचे फिर्यादीवरुन शेवगाव पोस्टे गुरनं 470/2025 भा.न्या.सं. कलम 103(1) प्रमाणे दि.22/05/2025 रोजी दाखल करण्यात आला होता. गुन्हयातील आरोपी सचिन गोरख भारस्कर वय-22 वर्षे रा. जुने दहीफळ ता. शेवगाव हा गुन्हा केल्यानंतर ताबडतोब फरार झाला होता. मा. पोलीस निरीक्षक समाधान नागरे शेवगाव पोलीस स्टेशन यांना गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, नमुद गुन्ह्यातील आरोपी सचिन गोरख भारस्कर हा नेवासा मार्गे पुणे येथे पळुन जाणार असल्याची गुप्त माहीती मिळाल्याने पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांनी पोलीस पथक तयार करुन त्याचा शोध घेणेकामी रवाना करण्यात आले होते. सदर आरोपी हा नेवासा मार्गे पुणे येथे पळुन जात असतांना फत्तेपुर ता. नेवासा शिवारामध्ये पाठलाग करुन त्यास ताब्यात घेण्यात आले आहे. सदर आरोपीस शेवगाव पोलीस स्टेशन येथे आणुन नमुद गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. सदरची कारवाई ही नवनिर्वाचित मा. पोलीस अधिक्षक श्री सोमनाथ घार्गे अहमदनगर, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. प्रशांत खैरे अहिल्यानगर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुनिल पाटील उपविभाग शेवगांव यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. समाधान नागरे, पो.हे.कॉ. चंद्रकांत कुसारे, पो.हे.कॉ. किशोर काळे, पो.कॉ. शाम गुंजाळ, पो.कॉ. राहुल खेडकर, पो.कॉ. संपत खेडकर, पो.कॉ. संतोष वाघ, पो.काँ. प्रशांत आंधळे, पो. हे. कॉ. निलेश म्हस्के तसेच नगर दक्षिण सायबर सेलचे पो.काँ. नवनिर्वाचित मा. पोलीस अधिक्षक श्री सोमनाथ घार्गे अहमदनगर, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. प्रशांत खैरे अहिल्यानगर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुनिल पाटील उपविभाग शेवगांव यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. समाधान नागरे, पो.हे.कॉ. चंद्रकांत कुसारे, पो.हे.कॉ. किशोर काळे, पो.कॉ. शाम गुंजाळ, पो.कॉ. राहुल खेडकर, पो.कॉ. संपत खेडकर, पो.कॉ. संतोष वाघ, पो.काँ. प्रशांत आंधळे, पो. हे. कॉ. निलेश म्हस्के तसेच नगर दक्षिण सायबर सेलचे पो.काँ. राहुल गुड्डु यांनी केली असुन वरील गुन्ह्यांचा तपास स.पो.नि. अशोक काटे हे करत आहेत.ताजा कलम

    नवीन पिढी आपल्या घरातील वरिष्ठ आणि वडिलधाऱ्यांचं ऐकत नाही आणि रागाच्या भरात आपल्या आयुष्या च वाटोळं करून घेत आहेत. आपला मुलगा घराबाहेर पडल्यावर काय करतो त्याच्या रागावर त्याचे नियंत्रण आहे कि नाही यो आपल्यासोबत काही हत्यार वगैरे बाळगतो का ??? या सर्व प्रश्नांमुळे पालक सुद्धा या सगळ्या घटनांसमोर आल्यानंतर पालक नेमके काय करतात हा सुद्धा सामाजिक प्रश्न उपस्थित होत आहे

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here