
शेवगांव तालुक्यातील धरण पट्यातील शेतीचे रान डुक्करामुळे प्रचंड नुकसान शेतकरी हैराण वनविभागाकडे तक्रारी
{ अविनाश देशमुख शेवगांव प्रतिनिधी }
आधीच पावसाने तालुक्यात ओढ दिल्याने आस्मानी संकटाने तालुक्यातील शेतकरी हैराण आहे त्यात रान डुकराचे त्रासाने सुलेमानी संकट आल्याने शेती करणं खूप अवघड झाले आहे? यावर शासनाने गंभीर दखल घेतली पाहिजे! या संधर्भात नेमक्या तक्रारी कोणाकडे करायच्या आणि कुठल्या कार्यालयात पाठपुरावा घ्यायचा याबाबत अनेक शेतकरी अनभिज्ञ आहेत शेतात अनेक वेळा मोकाट माजलेले रानडुकरं एकट्या दुकट्या शेतकरी शेतमजूर यांचेवर हल्ला करत असतात त्यात गंभीर जखमी होऊन अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत
शहरटाकली परिसरात रान डुक्करनी उसासह
अन्य पिकाचे खुप मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे! त्यावर शेतकऱ्यांनी खुप उपाय केले परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही ? परिणामी या भागातील शेतकऱ्यांनी मका हरबरा बाजरी भुरमुग मूग आदी पीक घेणे बंद केले आहे!
त्याचाच परीनाम आज
बाजारपेठेत शेंगदाणे 145 / 150 ₹ हरबराडाळ 80/90 ₹ किलो मूग डाळ110 ₹ प्रति किलो
झाली आहे भविष्यात अन्न धान्य आणि डाळीचे भाव भाव गगनाला भिडतील! शेतकऱ्यांचे शेतात एक गांजाचे झाड असेल तर लगेच शासनाला कळते ?
शेतकरयांनी त्याचेच शेतातिल मुरूम दगड माती उचलली तर लगेच शेतकऱ्यास अटक होते.
आणि आज शेतकऱयांचे लाखो रुपयांचे नुकसान वन्यप्राणी करतात त्यावर शासन काहीच कारवाई करत नाहीं असा सवाल शेतकरी वर्गातून विचारला जात आहे!

ताजा कलम
मागे खुंटेफळ येथे शेत शिवारात मोरे नावाच्या शेतकऱ्यावर रानडुकरानी हल्ला केला होता त्याला संसर्ग zala. होता तर त्यासाठी हैद्राबाद येथून लस मागवावी लागली होती प्रतिकूल परिस्तितीत आलेले पीक आणि शेतकरयांचा जीव दोन्हीही धोक्यात आहे वन अधिकाऱ्यांनी महसूल आणि पोलीस प्रशासनाने लक्ष घालून शेतकरी आणि त्याचा शेतमाल सुरक्षित कसा राहील याची काळजी घेतली पाहिजे
अविनाश देशमुख शेवगांव
सामाजिक कार्यकर्ता पत्रकार
