अविनाश देशमुख शेवगाव*
सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार
[03/09, 8:29 am] Avinash Deshmukh: शेवगांव एस. टी. आगाराला लागली घरघर गेली कित्येक महिने डेपो म्यानेजरच नाही काही झाले बिन पगारी फुल अधिकारी कर्मचारी आणि प्रवासी बेजार
{ अविनाश देशमुख शेवगाव }
एकेकाळी जिल्यात उत्पन्नाच्या बाबतीत आणि बस फेऱ्यांच्या बाबतीत आघाडीवर असलेला शेवगांव एस. टी. डेपो आज आंधळं दळतंय आणि कुत्र पीठ खातय असा कारभार सुरु आहे.
शेवगांव डेपोला शालेय फेऱ्या आणि लॉंग रूट साठी किमान 60 ते 65 बस अपेक्षित आहे परंतु सध्या चालू आणि बंद मिळून फक्त 35 बस उपलब्ध आहे त्यामुळे शेवगांव पुणे शेवगांव नाशिक शेवगांव धुळे शेवगांव संभाजीनगर शेवगांव परभणी शेवगांव पंढरपूर शेवगांव कोल्हापूर अश्या लॉन्ग रूट च्या अनेक फेऱ्या गेले कित्येक महिन्यात झाल्याचं नाहीत आलोकेशन प्रमाणे गाड्या सुटत नाही शेवगांव चे बस स्थानक पाथर्डी गेवराई पैठण अंबड नेवासा या शेजारच्या डेपोच्या भरवश्यावर चालू आहे अश्या डेपो म्यानेजर प्रभारी फंड त्यांचा कारभार थंड काही हाताखालचे अधीकारी स्वतःला डेपो म्यानेजर समजू लागले बिनपगारी आन फुल अधिकारी कारभार सकाळी सात वाजता आलेले कंडक्टर आणि ड्रायव्हर गाडी शिल्लक नाही म्हणून सहा सहा तास वाट पाहून दुपारी घरी जातात त्यांच्यावर बळजबरी रजा लादली जाते
ताजा कलम
अधिकारी वर्ग बाहेरगावी राहून उंटावरून शेळ्या हाकत असल्याने रात्री अपरात्री अधिकारी नसतात फोन उचलत नाहीत कर्मचारी आणि अधिकारी यांच नातं विळा भोपळा आहे परिणामी प्रवाशांवर हाल अपेष्टा सहन करण्याची वेळ येत आहे विभागीय परिवहन अधिकारी सपकाळ म्याडम यांनी तात्काळ शेवगांव ला एक पूर्णवेळ डेपो म्यानेजर देणे गरजेचे आहे त्या फक्त फोनवर गोड बोलून वेळ मारून नेतात वास्तविक शेवगांव डेपोला नवीन 16 बस ची गरज आहे मला दोन हाना पण डेपो म्यानेजर म्हणा अशांचा बंदोबस्त केला पाहिजे
क्रमशः
बसस्थाकाचे वेगाने सुरु असलेले बांधकाम काम नवीन गिनीज वल्ड रेकॉर्ड कारण्याचच्या मार्गावर सहा वर्षात बांधले चारखोल्या आणि विस खांब तो ठेकेदार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचा शेवगांव क्सचे प्रवासी करणार लिबच्या झाडाखाली यथोचित सन्मान
अविनाश देशमुख / शेवगाव
सामाजिक कार्यकर्ता पत्रकार