शेत तळ्यातील पाण्यात दोन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू

श्रीगोंदा,दि.२८ ऑगस्ट,(प्रतिनिधी) – कर्जत तालुक्यातील ताजु येथील दोन मुलांचा श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव येथील शेततळ्यामधील पाण्यात बुडून मृत्यू झाला. हरी नामदेव कोकरे (वय १५) व विरेंद्र रामा हाके (वय १६) अशी नावे आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त हाेत आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की कर्जत तालुक्यातील ताजू गावाजवळ असणाऱ्या लोखार येथील मावळे वस्तीवरील हरी आणि विरेंद्र हे दोघेजण शेळ्या चारण्यासाठी श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव शिवारात गेले होते. याच दरम्यान हरी व विरेंद्र त्यांच्याकडील शेळ्या चरत- चरत थेट शेडगाव शिवारातील भवानी माता मंदिराच्या पुढे आल्या. याठिकाणी पुणे येथील चोपडा यांचे शेततळे आहे. या शेततळ्यामध्ये दुपारी एकच्या सुमारास हरी व विरेंद्र उतरले. त्यांना शेततळ्यातील पाण्याचा अंदाज आला नाही. दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.या परिसरात कोणीच नसल्यामुळे हे दोघे पाण्यात बुडाल्याचे कोणाच्याही लक्षात आले नाही. मात्र, सवयीप्रमाणे शेळ्या सायंकाळी पाच ते साडेपाचच्या दरम्यान शेळ्या घरी परतल्या मात्र. मुले आली नाहीत म्हणून घरच्यांनी आजुबाजूच्या परिसरात मुलांना शोधकार्य सुरू केले. याच दरम्यान हरी व विरेंद्रचे कपडे आणि चपला भवानी माता मंदिरासमोर असलेल्या चोपडा यांच्या शेत तळ्याजवळ सापडल्या. यानंतर यातील एक मुलगा पाण्यावर तरंगताना दिसला. यानंतर हरी व विरेंद्र पाण्यात बुडाल्याचे कुटुंबीयांना समजले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here