शेततळ्यात बुडून तीन लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू

दुर्दैवी मृत्यू . -श्रीरामपुर तालुक्यातील पढेगावा जवळ असणाऱ्या कान्हेगाव येथील शेततळ्यात बुडून तिन लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली असुन या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या बाबत समजलेली माहीती अशी की चैतन्य अनिल माळी वय १२ वर्ष दत्ता अनिल माळी वय ८ वर्ष चैतन्य शाम बर्डे वय ४ वर्ष ही तीन लहान मुळे खेळता खेळता कान्हेगाव येथील शेतकऱ्यांच्या शेततळ्याजवळ गेली पावसाचे पाणी या तळ्यात साचलेले होते त्यामुळे पाण्याचा अंदाज त्यांना आला नाही व हे तिनही मुले पाण्यात बुडून मयत झाले ही घटना परिसरात पसरताच ग्रामस्थ गोळा झाले तिनही मुलांचे शव बाहेर काढुन शवविच्छेदनासाठी श्रीरामपुर येथे पाठविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here