शिवस्वराज्य दिनी ‘कचरामुक्त पुणे जिल्हा’ मोहिमेचा शुभारंभ आज करण्यात आला. हे अभियान शिवस्वराज्य दिन ते गांधी जयंती या दरम्यान राबवण्यात येणार आहे. अभियान गावागावात घराघरात पोहोचवण्यासाठी जिल्ह्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत. आज राज्यभर शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारुन आपण शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर निष्ठा ठेवून काम करण्याचा संकल्प करुया. महाराष्ट्राला आणखीन महान राष्ट्र बनवण्यासाठी एकजूटीनं व एकदिलानं काम करा, असं आवाहन आहे. हे अभियान पुणे जिल्ह्याच्या आरोग्य, आर्थिक, सामाजिक विकासाला बळ देईल. छत्रपती शिवरायांनी, जिजाऊ माँसाहेबांनी वसवलेल्या पुण्याचा गौरव वाढवण्याचा काम करेल, याची मला खात्री आहे. सन २०१६ मध्ये पुणे जिल्हा परिषदेनं शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्याचा ठराव केला होता. आज तोच शिवराज्याभिषेक दिन राज्यस्तरावर शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारनं घेतला. ही जिल्हा परिषदेसाठी आनंदाची बाब आहे. शिवस्वराज्य दिनाच्या निमित्तानं आपण राज्यातील प्रत्येक जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतमध्ये शिवस्वराज्य गुढी उभारत आहोत. ही गुढी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची पताका आहे. अभिमान, स्वाभिमानाची ही पताका आपल्याला कायम फडकवत ठेवायची आहे. कोरोना संकटातून आपल्याला राज्याला, देशाला बाहेर काढायचं आहे. सध्या ग्रामीण भागात वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता कोरोनामुक्त गाव ही स्पर्धा राज्य शासनानं जाहीर केली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या कोरोनामुक्तीच्या कामाला प्रोत्साहन मिळेल. तज्ज्ञांनी कोरोनाच्या तिस-या लाटेचा इशारा दिला आहे. खबरदारी म्हणून प्रत्येक गावात ३०-३० बेडची कोरोना केंद्र उभारत आहोत. पंधराव्या वित्त आयोगातून कोरोनाच्या उपाययोजना करण्यासाठी निधी देण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात कोरोनाप्रतिबंधित उपाययोजना प्रभावीपणे राबवण्यास मदत होईल. महिला धोरणांबाबत राज्य नेहमी अग्रेसर आहे. मुलींना १२ वीपर्यंतचे शिक्षण मोफत, राज्य परिवहन महामंडळाच्या बसने मोफत प्रवासासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले योजना सुरु केली आहे. कचरामुक्त, गावस्वच्छता, नालेसफाई, एक कुटुंब एक शोषखड्डा मोहिमेमध्ये जिल्ह्यानं सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी प्रयत्न करावे. पुणे शहर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका शेजारील गावांची कचरा समस्याबाबत महापालिका आणि ग्रामपंचायतींनी विशेष प्रयत्न करावे.
ताजी बातमी
ठेकेदाराकडून लाच घेताना पारनेर पंचायत समितीत जि.प.च्या उपअभियंत्यासह तिघे रंगेहात
पारनेर पंचायत समितीत लाचखोरीचा 'ट्रॅप'उपअभियंत्यासह तिघे रंगेहात६५,६०० रुपयांच्या लाच व्यवहारावर एसीबीची कारवाईपारनेर : प्रतिनिधी“बिल काढायचं असेल तर...
मुंबईमध्ये खळबळ, ठाकरे गटाच्या शिवसैनिकाची हत्या, लोखंडी रॉडने डोक्यात वार
मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याची निघृण हत्या करण्यात आली आहे. विक्रोळीमध्ये गुरूवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली...
घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर रोखा; दोषींवर कठोर कारवाई करा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया…..
अहिल्यानगर, दि. २१ : घरगुती गॅस सिलेंडरचाअवैधरित्या व्यावसायिक आस्थापनांमध्ये होणारा वापर थांबवून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश...
चर्चेत असलेला विषय
एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच; जळगाव विभागात 22 कर्मचारी बडतर्फ
जळगाव : एसटी कामगारांचा संप चिरघळताना दिसून येत आहे. संपाची मुदत संपून देखील कामावर न येणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवर आता प्रशासनाकडून बडतर्फीची कारवाई...
कोविड `१९ मुळे झालल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५० लाखांच्या धनादेशांचे वाटप
कोविड `१९ मुळे झालल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५० लाखांच्या धनादेशांचे वाटप
राज्यामध्ये कोव्हिड-१९ चा प्रादूभाव सुरु झाल्यापासून अहमदनगर...
चोराला पकडण्यासाठी पिंपरी पोलिसांनी लढवली शक्कल:
चोराला पकडण्यासाठी पिंपरी पोलिसांनी लढवली शक्कल, तरुणीच्या नावे फेसबकुवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आणि…
पिंपरी-चिंचवडमधील सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी...
गोवंशीय जनावरांची वाहतुक करणारा टेम्पो कोतवाली पोलीसांच्या ताब्यात गुन्हा दाखल..
दि.०८/०४/२०२३ रोजी रात्री ०९.४५ वाजण्याचे सुमारास कोतवाली पोलीसांना गुप्त बातमीदारा मार्फत माहीती मिळाली की, अहमदनगर शहरातून एक...






