शिवसेना UPA मध्ये सहभागी होणार ? संजय राऊत राहुल गांधी आणि प्रियंका गांधींना भेटणार

529

संजय राऊत राहुल गांधी आणि प्रिंयका गांधींची 2 दिवसांत भेट घेणार आहेत. ही भेट संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात यूपीएवरुन होणार असल्याची माहिती मिळतेय. महाराष्ट्रात काँग्रेसच्या पाठींब्यावर शिवसेनेचे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असले तरी शिवसेना अजून तरी काँग्रेस प्रणित यूपीएमध्ये नाही.

मुंबई : काँग्रेसला बाजूला ठेवून, कोणतीही आघाडी होऊ शकत नाही असं पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) मुंबईहून पश्चिम बंगालला परतताच शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) बोलले होते. त्यानंतर आता संजय राऊत राहुल गांधी आणि प्रिंयका गांधींची 2 दिवसांत भेट घेणार आहेत. ही भेट संयुक्त पुरोगामी आघाडी (United Progressive Front) अर्थात यूपीएवरुन होणार असल्याची माहिती मिळतेय. महाराष्ट्रात काँग्रेसच्या पाठींब्यावर शिवसेनेचे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असले तरी शिवसेना अजून तरी काँग्रेस प्रणित यूपीएमध्ये नाही. त्यामुळं सुरुवातीच्या चर्चेसाठी राऊत राहुल गांधी आणि प्रियंका गांधींना भेटणार असल्याचं कळतंय.ममतांचा काँग्रेसवर निशाणा, पवार, राऊतांची सारवासारव2024 मध्ये मोदींविरोधात भक्कम आघाडी करण्याच्या उद्देशानं ममता बॅनर्जी मुंबईत आल्या होत्या. यावेळी त्यांनी संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंची भेट घेतली आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांसोबतच 1 तास चर्चाही झाली. मात्र ममतांच्या टीकेवरुन हे लक्षात येतंय, की त्यांना काँग्रेसलाच दूर ठेवायचं आहे. पण महाराष्ट्रातील राजकीय समीकरण पाहता, हे राष्ट्रवादी आणि शिवसेनेला मान्य नाही. यूपीएलाच मजबूत करण्यावर पवारांसह शिवसेनेचाही भर असल्याचं दिसून येत आहे.

यूपीएमध्ये सध्या 19 पक्षयूपीएत सध्या 19 पार्टी आहेत. ज्यात काँग्रेस, डीएमके, राष्ट्रवादी काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स, झारखंड मुक्ती मोर्चा, इंडियन यूनियन मुस्लिम लीग, एमडीएमके, आरएसपी, गोवा फॉरवर्ड पार्टी, या सारख्या पक्षांचा समावेश आहे. असं असलं तरी 19 पक्षांच्या यूपीएची ताकद मोदींच्या तुलनेत कमीच आहे. कारण,

>> एनडीएच्या एकूण खासदारांची संख्या 352 आहे

>> त्यात भाजपचेच 303 खासदार आहेत
>> तर यूपीएचे 90 खासदार आहेत. ज्यात काँग्रेसच्या खासदारांची संख्या 52 आहे.शिवसेना यूपीएमध्ये सहभागी होऊन भाजपला टक्कर देणार?शिवसेनेचा मार्ग हा आता वेगळा झालाय. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे शिवसेनेचे राजकीय मित्र झाले आहेत. उद्धव ठाकरेंची सध्या भूमिका पाहता, हे आगामी निवडणुकांमध्ये भाजपसोबत जातील असं सध्या दिसत नाही. त्यामुळं शिवसेना यूपीएमध्ये सहभागी होऊन भाजपला टक्कर देणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here