शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पत्नीची आत्महत्या, कारण अस्पष्ट;

शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पत्नीची आत्महत्या, कारण अस्पष्ट; पोलीस तपास सुरुमंगेश कुडाळकर यांच्या पत्नीची आत्महत्या; कारण अस्पष्ट

शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पत्नीने आत्महत्या केल्याचे वृत्त आहे. रजनी कुडाळकर असे त्यांचे नाव आहे. आत्महत्येमागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मुंबईतील कुर्ला येथील नेहरू नगर येथे राहत्या घरी त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.

पोलीस अधिक तपास करत आहेत. रजनी कुडाळकर या 42 वर्षांच्या होत्या.

मंगेश कुडाळकर हे कुर्ला विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार आहेत.रजनी या मंंगेश कुडाळकर यांची दुसरी पत्नी असून, पहिल्या पत्नीच्या अपघाती निधनानंतर त्यांनी दुसरा विवाह केला होता.

रजनी यांनी घरगुती वादातून हे पाऊल उचलले असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकड़ून वर्तवण्यात येत आहे.

याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याचे नेहरू नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक चंद्रशेखर बाबल यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here