शिवद्रोही श्रीपाद छिंदम याच्यासह त्याचा भाऊ श्रीकांत याना तोफखाना पोलिसांनी आज अटक केली आहे

992

अट्रॉसिटीच्या गुन्ह्यामध्ये फरार असलेला भाजपा चा माजी उपमहापौर, शिवद्रोही श्रीपाद छिंदम याच्यासह त्याचा भाऊ श्रीकांत याना तोफखाना पोलिसांनी आज अटक केली आहे.

नगर शहरातील दिल्ली गेट परिसरामध्ये मागील महिन्यामध्ये एका गाळेधारकांना दमदाटी करून त्याला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून धमकावण्याचा प्रकार चिंद्दम व त्याच्या साथीदाराने केला होता या प्रकरणासंदर्भात संबंधित व्यक्तीने त्याच्या साथीदारांना विरोधात येथील तोफखाना पोलिस ठाण्यांमध्ये अॅट्रॉसिटी चा गुन्हा दाखल केला होता. या घटनेपासून वरील आरोपी हे फरार होते,

गेल्या काही दिवसांपासून छिंदम यांचा शोध पोलीस घेत होते काल रात्री च्या सुमाराला ते नगर शहरामध्ये आले असल्याची माहिती मिळाल्यानंतर तोफखाना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. या संदर्भामध्ये शहर उप विभागीय अधिकारी विशाल ढुमे व तोफखाना पोलीस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी आम्ही या दोघांना अटक केली असून त्यांच्या उर्वरित साथीदारांचा शोध घेत असून यामध्ये अजून दोन जणांना अटक पूर्व जामीन मिळाल्यामुळे त्यांचे सुद्धा चौकशी सुरू केली असल्याचे त्यांनी सांगितले।

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here