
शिडी पोलीस ठाणे हद्दीत दि. २४/१२/२०२४ ते दि. ०२/०१/२०२५ रोजी नववर्ष प्रारंभ निमीत्ताने सालाबाद प्रमाणे मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. शिर्डी हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे धार्मिक स्थळ असुन देश- विदेश, राज्य-परराज्यातुन आणि बाहेरील देशातुन शिर्डी शहरात भाविकांची व त्यांचे वाहनांची प्रचंड गर्दी होण्याची संभावणा आहे. त्यातच सिन्नर शिर्डी हा महानार्ग शिर्डी शहरातुन जात असल्याने गर्दीच्या कालावधीत वाहतुकीमुळे भाविकांची गैरसोय होवु नये तसेच साई मंदिर व भाविकांच्या सुरक्षिततेस धोका पोहोचुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये या करीता श्री. साईबाबा मंदीर व परीसरात वाहतुकीचे नियमन करणे आवश्यक आहे. तरी दिनांक २४/१२/२०२४ रोजीचे सकाळी ०६.०० वा. पासुन ते दिनांक ०२/०१/२०२५ रोजी २३.०० वा. पावेतो शिर्डी शहर व श्री. साईबाबा मंदिर परिसरात येणारी सर्व प्रकारची खाजगी, प्रवाशी व मोठी वाहने यांच्या मार्गामध्ये खालीलप्रमाणे बदल करण्याचे नियोजित आहे.खाजगी, प्रवाशी व मोठी वाहने ही शिर्डी शहरा बाहेरील पर्यायी मार्गाने (रिंगरोडने) वळविणेवायत आदेश आज पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी जारी केले आहे.
१) अहिल्यानगर कडुन मनमाडकडे येणारे खाजगी व प्रवासी व इतर मोठ्या वाहनांकरीता वाहतुकीचा मार्ग -➡️> :- आरबीएल चौक व्दारका सर्कल चौक श्री साईनाथ हॉस्पीटल चौक श्रीराम सर्कल चीकझुलेलाल चौक – लक्ष्मीनगर चौक टी पॉईट➡️
२) मनमाड कडुन अहिल्यानगरकडे येणारे प्रवासी व इतर मोठ्या वाहनांकरीता वाहतुकीचा मार्ग -:- ➡️लक्ष्मीनगर चौक झुलेलाल चौक श्रीराम सर्कल चौक श्री साईनाथ हॉस्पीटल चौक व्दारका सर्कल चौक आर बी एल चौक➡️उपरोक्त आदेशचे पालन करुन नागरीकांनी पोलीस प्रशासनास सहकार्या करणे बाबत पोलीस अधीक्षक राकेश ओलायांनी अवाहन केले आहे.टिप- प्रस्तुत आदेश शिर्डी देवस्थानशी संबंधित वाहने, शासकीय वाहने, अॅम्ब्युलन्स, फायर ब्रिगेड, अत्यावश्यक कारणास्तव स्थानिक प्रशासनाने परवानगी दिलेल्या वाहनांना लागु राहणार नाही. असे आदेशामध्ये पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी म्हटले आहे.





