शिरूर येथे काही समाज कंटकाकडून अल्पसंख्याक समाजातील तरुणाची राहत्या घरी जाऊन धारदार शस्त्राने हल्ला करत हत्या करण्यात आली. या घटनेत दोन तरुणांपैकी मुजम्मिल शेख याचा मृत्यू झाला असून मोहम्मद शकील गंभीर जखमी आहे.

    31

    सदर तरुण मूळचे नांदेड येथील असून कामानिमित्त रांजणगाव एमआयडीसीत वास्तव्यास होते. गाडीचा कट लागल्या मुळे मनात राग धरून हा हल्ला करण्यात आला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. दोन्ही आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आली असून तपास सुरू आहे. घटनास्थळावर स्थानिक पदाधिकारी राहील शेख आणि स्थानिक नागरिक उपस्थित असून सत्य परिस्थिती चा आढावा घेत आहेत. संपूर्ण माहिती थोड्या वेळात मिळेल असा अंदाज आहे.

    कोणाशीही संपर्कात नसलेले काम ते घर घर ते काम असा दैनंदिन दिनक्रम असलेल्या तरुणांनावर असा भ्याड हल्ला करणाऱ्या प्रवृत्तीचा जाहीर निषेध करतो. दिवसेंदिवस अल्पसंख्याक तरुणांवर हल्ले होण्याच्या घटना चिंताजनक असून. काल शिरूर येथील घडलेल्या घटनेच्या मागील सत्य महाराष्ट्र पोलीस लवकरच जनतेसमोर नक्की आणतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते सादिकभाई यांनी दिली.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here