अहमदनगर : Ahmednagar Crime | अहमदनगर येथील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील काही अल्पवयीन शाळेच्या विद्यार्थ्यांनी (School students) आपल्या शिक्षिकेचे (Teacher) फोटो मार्फ करत समाज माध्यमांवर प्रसारित केले आहे.
या प्रकारावरुन (Ahmednagar Crime) गुन्हा (FIR) दाखल झाल्यानंतर पोलिसांनी चौकशी केली. यानंतर याप्रकरणी कृत्य अल्पवयीन विद्यार्थ्यांनीच केल्याचा खुलासा झाला आहे. याप्रकरणी पोलिस (Police) तपास करीत आहेत.याबाबत माहिती अशी, हा प्रकार अहमदनगर जिल्ह्यातील एका प्रतिष्ठित शाळेत घडला आहे.काही विद्यार्थ्यांनी एका शिक्षिकेचे फोटो मॉर्फ करून त्याचं रुपांतर अश्लील फोटोंमध्ये (Ahmednagar Crime) केलं आहे. इतकंच नाही तर,त्या विद्यार्थ्यांनी हे फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड केले आहेत. धक्कादाययक बाब म्हणजे, शिक्षिकेला सतत व्हिडीओ कॉल (Video call) करत अश्लील कृत्य केलं जात होतं.दुसऱ्या एका शाळेत काही विद्यार्थ्यांनी शिक्षिकेचा मोबाइल नंबर पॉर्न वेबसाइट्सवर अपलोड केला होता.
या प्रकरणावरुन पिडित शिक्षकांनी सायबर पोलीस ठाण्यात (Cyber Police Station) तक्रार दाखल केली आहे.त्याचबरोबर संबंधित कृत्य करणारे हे ओळखीचेच शाळेतील अल्पवयीन विद्यार्थी असल्याचं उघडकीस झालं आहे.याप्रकरणी आय टी.ॲक्ट 2000 कलम 67a नुसार कारवाई करण्यात आली.
याप्रकरणी विधिसंघर्षगस्त बालकांना ताब्यात घेतलं आहे. सर्व विधिसं घर्षग्रस्त बालकांची रवानगी बालसुधारगृहात केली असून याबाबत अधिक तपास पोलिस (Police) करीत आहेत.