शिक्षण क्षेत्रात खळबळ ! पुण्याच्या प्रसिद्ध कॉलेजवर 10 वर्षांची बंदी ?

    92

    Pune News : वाघोली येथील पार्वतीबाई गेनबामोझे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगने मोठ्या गैरप्रकार केल्याची माहिती समोर आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने याप्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली असून, या कॉलेजवर कडक कारवाईची शिफारस करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांकडून रात्रीच्या अंधारात पुन्हा उत्तरपत्रिका लिहून घेणे ही घटना शिक्षण क्षेत्रात खळबळ माजवणारी ठरली आहे.

    या प्रकरणात आरोप असा आहे की, परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांनी लिहिलेली उत्तरपत्रिका स्ट्रॉगरूममधून बाहेर काढण्यात आली. त्यानंतर त्या उत्तरपत्रिका रात्रीच्या वेळी विद्यार्थ्यांना परत देण्यात आल्या आणि त्यांना पुन्हा उत्तर लिहिण्यास सांगितले गेले. हा प्रकार पैसे कमावण्याच्या हेतूने काही प्राध्यापकांनी आणि कर्मचाऱ्यांनी केला, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

    या प्रकाराची माहिती मिळताच पुणे विद्यापीठाने एक सत्यशोधन समिती नेमली. या समितीचे नेतृत्व विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य देविदास वायदंडे यांनी केले. समितीत डॉ. प्रमोद पाटील, डॉ. सुनील ठाकरे, डॉ. सुनीता आढाव आणि समीर भोसले यांचा समावेश होता. या समितीने संबंधित कॉलेजला भेट देऊन सखोल चौकशी केली आणि विद्यापीठाकडे सविस्तर अहवाल सादर केला.

    कॉलेजवर मोठी कारवाईया अहवालात कॉलेजवर मोठी कारवाई सुचवण्य आली आहे. त्यामध्ये:

    कॉलेजचे परीक्षा केंद्र १० वर्षांसाठी बंद ठेवण्याची शिफारस, संस्थेला ३ ल रुपयांचा दंड, संबंधित प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर ३ वर्षांसाठी परीक्षा कामांपासून दूर ठेवण्याची शिफारस अहवाल विद्यापीठाच्या अधिकार मंडळासमोर सादर केला जाणार आहे, आणि त्यावर अंतिम निर्णय घेतला जाईल.

    सुधारणा कुठे आवश्यक?

    फक्त परीक्षा गैरप्रकारांवर कारवाई करून शिक्षण व्यवस्थेत सुधारणा होईल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. विद्यापीठाने संबंधित कॉलेजमध्ये पूर्णवेळ प्राचार्य आणि अधिकृत प्राध्यापकांची नेमणूक होणे आवश्यक असल्याचे मानले आहे. यामुळे अशा प्रकारचे प्रकार पुन्हा होणार नाहीत याची खात्री करता येईल. विद्यापीठ यासंदर्भात व निर्णय घेते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. ह प्रकार म्हणजे शिक्षण क्षेत्रासाठी एक गंभीर इशा आहे. विद्यार्थ्यांचे भवितव्य सुरक्षित ठेवण्यासाठी अशा घटनांवर वेळेवर आणि कठोर कारवाई होप आवश्यक आहे. विद्यापीठाचा पुढील निर्णय हा महाविद्यालयांसाठीही एक बोध देणारा ठरू शकता

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here