शिक्षक भरती घोटाळाः आणखी एका शिक्षणाधिकाऱ्याला अटक; 12 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप

    42

    शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी सायबर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. नागपूर जिल्हा परिषदचे माजी शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर यांना एसआयटीने अटक करण्यात आली आहे. शालार्थ ऑनलाइन वेतन प्रणालीच्या गैरवापराच्या संदर्भात एसआयटीच्या सायबर सेलने ही कारवाई केलीय. माजी शिक्षणाधिकाऱ्यावर तब्बल १२ कोटींहून अधिक रकमेची फसवणूक केल्याचा आरोप ठेवण्यात आलाय.

    नागपूर विभागाच्या शिक्षण उपसंचालक कार्यालयाने तक्रार केल्यानंतर ही बाब उघडकीस आली. या तक्रारीच्या आधारे सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीच्या विविध क्लमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याची चौकशी विशेष तपास पथकाकडून करण्यात येत आहे. शालार्थ ऑनलाइन प्रणालीचा बेकायदेशीरपणे वापर करून बनावट शालार्थ आयडी आणि ड्राफ्ट तयार करण्यात आले होते.

    बनावट शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्य नावाने या बनावट आयडीद्वारे वेतन आणि देणी काढण्यात आली. शालार्थ आयडीचे प्रस्तावात बनावट कागदपत्र असताना शहानिशा न करता त्याला प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून मंजुरी दिल्याचा आरोप देखील करण्यात आलाय. शालार्थ आयडी प्रकरणात मंजुरी देताना शासनाचा सुमारे 12 कोटी रुपयांचा महसूल लाटल्याचा आरोप माजी शिक्षणाधिकाऱ्यावर करण्यात आलाय.

    या घोटाळ्या प्रकरणी आतापर्यंत एकूण २६ आरोपींना अटक करण्यात आलीय. यात शिक्षण उपसंचालक, शिक्षण अधिकारी, लिपिक, शाळेचे मुख्याध्यापक, शाळा संचालक आणि शिक्षकांचा समावेश आहे. सर्व आरोपींविरुद्ध प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालय क्रमांक १० मध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आलेत.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here