शिकवणीच्या नावाखाली अल्पवयीन मुलींशी अश्लील वर्तन..शिक्षकाच्या विरोधात गुन्हा दाखल :

अहमदनगर हादरले..शिकवणीच्या नावाखाली अल्पवयीन मुलींना शाळेत बोलवायचा अन..अहमदनगर तालुक्यातील एका प्राथमिक शाळेतील एक शिक्षक विद्यार्थिनींना शाळेत बोलावून घेत त्यांच्याशी अश्लील चाळे करायचा. त्याचा हा कारनामा मुलींनी पालकांना सांगितल्यानंतर पालकांनी शिक्षकाचे हे गैरकृत्य समोर आणले आणि एका पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनंतर नगर तालुका पोलीस ठाण्यात संतोष एकनाथ माघाडे ( वय 35 ) या शिक्षकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.उपलब्ध माहितीनुसार, संतोष माघाडे हा नगर तालुक्यातील एका प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे. कोरोनामुळे शाळा बंद असल्या तरी माघाडे हा शिकवणीच्या नावाखाली मुलींना शाळेत बोलावून घ्यायचा आणि आणि त्यांच्याशी अश्लील चाळे अथवा हावभाव करत असायचा. गेल्या अनेक दिवसांपासून मुली त्याचा हा त्रास सहन करत होत्या मात्र शिक्षक असल्याने त्या घाबरत देखील होत्या मात्र अखेर धाडस करून मुलींनी हा प्रकार घरी सांगितला आणि प्रकाराला वाचा फुटली. एका मुलीच्या पालकाने दिलेल्या फिर्यादीवरून संतोष माघाडे याच्या विरोधात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेले अनेक दिवसांपासून त्याचा हा प्रकार सुरू होता. शाळेत आलेल्या मुलींशी हा नराधम अश्लील चाळे करायचा. मुलींनी घरी पालकांना ही गोष्ट सांगितल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पुढील तपास नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक राजेंद्र सानप हे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here