
मुंबईतील आमदार निवासातील कँटीन चालकाला मारहाण केल्यापासून राज्यभर चर्चेत आलेले, आणि आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायमच चर्चेच्या केंद्रस्थानी राहणारे आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा खळबळजनक विधान केलं आहे.
अलीकडेच एका हॉटेलमध्ये वेटर आणि कुकला मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच, आता त्यांनी थेट माजी खासदाराला खुले आव्हान दिलं आहे. मुंबईच्या आझाद मैदानात “तू आणि मी -दोघंच ! मध्ये तिसरा कोणी येणार नाही,” असं थेट चॅलेंज गायकवाड यांनी एमआयएमचे नेते आणि खासदार इम्तियाज जलील यांना दिलं आहे.
गायकवाड यांच्या या वादग्रस्त विधानावर आता इम्तियाज जलील काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. विशेष म्हणजे, अवघ्या तीन दिवसांपूर्वीच गायकवाड यांनी “आता मी मीडियाशी बोलणार नाही,” असं जाहीर केलं होतं. मात्र, त्यांनी पुन्हा माध्यमांसमोर येत आपलीच भूमिका बदलली आहे.
दरम्यान, हे संपूर्ण प्रकरण अधिकच तापलं असून, राजकीय वर्तुळात त्यावरून वेगवेगळ्या पतिकिया रमत लागल्या आहेत