- अंडर-19 वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाने अंतिम सामन्यात इंग्लंडचा पराभव करून विक्रमी पाचव्यांदा विजेतेपद मिळवले. त्यानंतर सोशल मीडियावरुन टीम इंडियावर शुभेच्छाचा वर्षाव सुरू झाला. त्यात अभिनेता शाहिद कपूर यानेही भारतीय संघाचे कौतुक केले..
- भारतीय संघाचे अभिनंदन करताना, मात्र शाहिद कपूरकडून मोठी चूक झाली नि तो ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला..अनेकांनी त्याची खिल्ली उडवली..
- शाहिदचं काय चुकलं..?
- यश धुल याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने हे विजेतेपद मिळवले.. मात्र, अंडर-19 भारतीय संघाचे अभिनंदन करताना, शाहिदने 2018 साली विजेतेपद मिळवणाऱ्या पृथ्वी शॉ याच्या संघाचा फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर टाकला होता. आपली चूक लक्षात आल्यावर त्याने तो फोटो हटवला, मात्र तोपर्यंत त्याचे स्क्रीनशॉट व्हायरल झाले होते.