शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अखेर जामीन…!कॉर्डिलिया क्रूझ अमलीपदार्थ प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अखेर जामीन, मुंबई हायकोर्टाकडून मोठा दिलासा…!मुंबई- बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला क्रुज पार्टी मध्ये आमली पदार्थ सेवन केल्याप्रकरणी गेल्या अनेक दिवसांपासून अटक होती. मुंबई सत्र न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला नव्हता. त्यामुळे आर्यनच्या वतीने मुंबई सत्र न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. यावर सलग दोन दिवस सुनावणी झाली. त्यानंतर आज गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने आर्यन खानसह त्याचा मित्र अरबाज आणि मूनमून धमेचा अशा तिघांना अटी आणि शर्तीवर जामीन मंजूर केला आहे. एक प्रकारे हा शाहरुख खानच्या परिवाराला मोठा दिलासा असून गेल्या अनेक दिवसांपासून आर्थर रोड जेलमध्ये कैदेत असलेल्या आर्यनची आता सुटका होणार आहे. आज जामीनाची पूर्तता केल्यानंतर आज किंवा उद्या त्याची ऑर्थर रोड कारागृहातून जामिनावर मुक्तता होईल. आज उच्च न्यायालयाने हा जामीन मंजूर केलेला असताना काही अटी आणि शर्ती लावण्यात आल्या आहेत. उच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान एनसीबी कडून आर्यन खान आणि त्याच्या दोन मित्रांच्या जामिनावर मोठा विरोध करण्यात आला. आर्यन खान हा नियमित अमली पदार्थाचे सेवन करत असल्याचं एनसीबीचे म्हणणं होतं. हा गुन्हा केवळ अमली पदार्थ सेवनाचा नसून अमली पदार्थ बाळगणे याबद्दलचा आहे असा युक्तिवाद करतानाच अरबाज त्याच्याकडे अमली पदार्थ सापडल्याचा दावा केलेला होता. आर्यन खान हा सुद्धा या कटातील महत्त्वाचा भाग आहे असे एनसीबी चे म्हणणे होतं. मात्र दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने आर्यन खान, अरबाज आणि मुनमुन धमेचा यांना जामीन मंजूर केलेला आहे . शाहरुख खान आणि त्याच्या परिवारासाठी हा मोठा दिलासा असल्याचं माणण्यात येत आहे.
ताजी बातमी
बिहारमध्ये पुन्हा ‘नितीश सरकार’ नितीश कुमारांनी १० व्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ
विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर बिहार एनडीएने नवीन सरकार स्थापन केले. जदयूचे नेते नितीश कुमार यांनी १०...
अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध, २७ नोव्हेंबरपर्यंत हरकती
अहिल्यानगर - अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी विधानसभेच्या मतदार यादीच्या आधारे तयार केलेल्या मतदार याद्या महाराष्ट्र...
राज्य शासनाच्या युवा धोरण समितीवर आमदार संग्राम जगताप यांची निवड
अहिल्यानगर : राज्य शासनाच्या युवा धोरणसमितीवर आमदार संग्राम जगताप यांची निवड झाली असून शालेय शिक्षण व क्रीडा...
चर्चेत असलेला विषय
नाशिकमध्ये कोरोनाच कहर, चार दिवसांत वाढले एक हजारांपेक्षा अधिक रुग्ण; नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन
नाशिक : नाशिकमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे पहायला मिळत आहेत. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क झालंय. नाशिक शहरात 1 जानेवारीला केवळ...
मेघालयातील कॉनराड संगमा यांनी अमित शाह यांना बॅकअपसाठी कॉल केला, तो लगेच मिळाला
शिलाँग: मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांनी गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना फोन करून राज्याच्या निवडणुकीत त्यांचा...
107 वर्षांनंतर, भारतीय सैनिक पॅरिसमध्ये पुन्हा मार्च करणार; पंजाब रेजिमेंटसाठी इतिहासाचे चाक परतले
2017 चा हॉलिवूड चित्रपट 'डंकर्क' जगभरात प्रदर्शित झाला तेव्हा भारतीय, विशेषत: ज्यांना लष्करी इतिहासात रस आहे, ते...
पुणे धक्कादायक: औंधमध्ये TCS कर्मचाऱ्याने पत्नी-मुलाची हत्या करून गळफास घेतला – रिपोर्ट
पुणे: खून-आत्महत्येच्या धक्कादायक घटनेत, एका 44 वर्षीय आयटी व्यावसायिकाने पुण्यातील औंध परिसरात गळफास घेण्यापूर्वी त्याची 40 वर्षीय...




