*शाहरुखकडे 25 कोटींच्या मागणीचा दावा; समीर वानखेडे यांच्याकडून आरोपांचं खंडन*
आर्यन खान ड्रग्ज केसमध्ये मुख्य साक्षीदार असलेल्या किरण गोसावीनं शाहरुख खानकडे 25 कोटींची मागणी केली, त्यात 18 कोटींवर डील झाली, असा खळबळजनक दावा किरण गोसावीचा बॉडिगार्ड प्रभाकर साईल यांनी दिली आहे. *दरम्यान, एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी या आरोप फेटाळून लावले आहेत. या विषयावर संध्याकाळी सविस्तर बोलेन, असे वानखेडे म्हणाले आहेत. मात्र, या आरोपांमुळे देशभरात खळबळ उडाली असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्येच जुंपली आहे.*