भुसावळ : शासकीय कामात अडथळा, शिवीगाळ प्रकरणी भुसावळ शहर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुंडलिक दगडू सूर्यवंशी (५२, रा.हिरानगर, भुसावळ) असे अटकेतील संशयित आरोपीचे नाव आहे.तक्रारदार तथा शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी दिनेश पाटील हे शनिवारी सकाळी नऊ वाजता नाहाटा महाविद्यालयाजवळील चौफुलीजवळ कर्तव्यावर असताना संशयित आरोपी सूर्यवंशी हे प्लॅटिना एमएच १९ डीएस.१३०९ दुचाकी येत असताना त्यांना थांबवण्यात आले. लायसन्सची विचारणा केली असता त्यांनी लायसन्स दाखवले मात्र त्याची मुदत संपल्याचे लक्षात आल्याने कर्मचारी पाटील यांनी त्याबाबत २०० रुपये दंडाची पावती दिली. याचा सूर्यवंशी यांना राग आला त्यांनी पोलीस कर्मचारी दिनेश पाटील, प्रदीप पाटील यांना शिवीगाळ करुन अंगावर धावून येऊन धक्काबुक्की करुन धमकावले व शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करीत गोंधळ निर्माण केला.याप्रकरणी पाटील यांच्या फिर्यादीनुसार सूर्यवंशी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. बाजारपेठ पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.याबाबत दिनेश पाटील यांच्या फिर्यादीवरुन बाजारपेठ पोलिसात गु.र.नं. ३६०/ २१, भा.दं.वि. ३५३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक गणेश धुमाळ तपास करीत आहेत.
ताजी बातमी
सुप्रीम कोर्ट चे मुख्य न्यायाधीश गवई यांच्यावर वकिलाकडून बुटफेक..
सोमवारी सर्वोच्च न्यायालयात एका वकिलाने सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर एका...
शिरूर येथे काही समाज कंटकाकडून अल्पसंख्याक समाजातील तरुणाची राहत्या घरी जाऊन धारदार शस्त्राने हल्ला...
सदर तरुण मूळचे नांदेड येथील असून कामानिमित्त रांजणगाव एमआयडीसीत वास्तव्यास होते. गाडीचा कट लागल्या मुळे मनात राग...
‘माझ्या नादी लागू नका, अन्यथा तुमच्यामुळे अजित पवारांचाही कार्यक्रम लावेन’, मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंना...
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण का घ्यायचंय? याबाबत धनंजय मुंडे यांनी दसरा मेळाव्यात सवाल उपस्थित केले होते. या...
चर्चेत असलेला विषय
अवघ्या 75 दिवसांत…: पंतप्रधान मोदींनी 2023 च्या पहिल्या काही महिन्यांतील भारताच्या कामगिरीची यादी केली
इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह 2023 च्या समारोपाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्य भाषण केले. पंतप्रधान मोदींनी कॉन्क्लेव्हच्या...
“केवळ चिनी प्रवाश्यांना लक्ष्य करत प्रवेश प्रतिबंध”: बीजिंग हिट
बीजिंग: चीनने मंगळवारी आपल्या प्रदेशातून परदेशात प्रवास करणार्या प्रवाशांवर सुमारे डझनभर देशांद्वारे ताज्या कोविड चाचणी आवश्यकतांची निंदा...
अलाहाबाद हायकोर्टाने मुस्लिम बाजूच्या याचिका फेटाळल्या, ज्ञानवापी मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या दाव्याला परवानगी दिली
ज्ञानवापी मशीद अस्तित्वात असलेल्या जागेवर मंदिराचा जीर्णोद्धार करण्याची मागणी करणार्या वाराणसी न्यायालयासमोर प्रलंबित असलेल्या दिवाणी खटल्याला आव्हान...