शहीद जवानांच्या कुटुंबियांना आवाहन

488

शहीद जवानांच्या कुटुंबियांना आवाहन

अहमदनगर: युध्दात किंवा युध्दजन्य परिस्थितीमध्ये शहीद झालेल्या जवानांच्या वीरपत्नी, वीरमाता व वीरपिता (ज्यांना केवळ Liberalised Family Pension आणि Specil Family Pension मिळत आहे.) त्यांना मदत करण्याचे युध्द विधवा असोसिएशन, शहीद भवन, नवी दिल्ली यांनी ठरविले आहे. तरी जिल्हयातील सर्व वीरपत्नी, वीरमाता व वीरपिता यांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून देण्यात आलेले ओळखपत्र, पीसीडीए, अलाहाबाद यांचे कडून प्राप्त झालेला पी.पी.ओ. युध्दात शहीद झालेल्याचे प्रमाणपत्र, पेंशन ज्या खात्यात जमा होते त्या बँकेचे पुस्तक, पॅन कार्ड, आधारकार्ड आदी कागदपत्रांच्या प्रती दिनांक 15 ऑक्टोबर 2021 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात जमा करावेत,

असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, अहमदनगर यांनी केले आहे. ज्या वीरपत्नी, वीरमाता व वीरपिता यांनी यापूर्वी या संधीचा लाभ घेतला असेल त्यांनी परत अर्ज करु नयेत. असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

***

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here