महापालिकेमार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘अमृत’ पाणीपुरवठा योजनेच्या महत्वाच्या कामासाठी तसेच कार्यरत शहर पाणीपुरवठा योजनेवरील इतर महत्वाची दुरूस्तीची कामे करण्यासाठी सोमवारी (दि. २०) सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत शट डाऊन घेण्यात येणार आहे. या काळात मुळानगर, विळद येथून होणारा पाण्याचा उपसा बंद राहणार असल्याने शहर पाणी वितरणासाठीच्या टाक्या भरता येणार नाही. परिणामी शहरासह उपनगरांचा पाणीपुरवठा आजपासून ३ दिवस विस्कळीत होणार आहे.. *मंगळवारी येथे पाणीपुरवठा :* बोल्हेगाव, नागापूर, सावेडी उपनगरातील गुलमोहर रोड पाईपलाईन रोड लक्ष्मीनगर, सुर्यनगर, निर्मलनगर, मुकुंदनगर तसेच केडगाव, नगर-कल्याण रोडवरील शिवाजीनगर परिसरास आज सोमवारी पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. पाणीपुरवठा हा मंगळवारी (दि. २१) करणेत येईल. *बुधवारी येथे पाणीपुरवठा :*शहराच्या मध्यवर्ती भागास म्हणजेच मंगलगेट, रामचंद्र खुंट, कोठला, झेंडीगेट, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, दाळमंडई, काळू ए बागवान गल्ली, धरती चौक, माळीवाडा, कोठी या भागात व गुलमोहर रोड, प्रोफेसर कॉलनी परिसर, सिव्हील हडको, प्रेमदान हाडको म्युनिसीपल हडको, सावेडी, सारसनगर व बुरुडगांव रोड या भागात मंगळवारी (दि.२१) पाणीपुरवठा होणार नसून तो बुधवारी (दि. २२) होईल. *गुरुवारी येथे पाणीपुरवठा :*शहराच्या मध्यवर्ती भागास म्हणजेच सर्जेपुरा, तोफखाना, सिध्दार्थनगर, लालटाकी, दिल्लीगेट, नालेगाव, चितळे रोड, ख्रिस्तगल्ली, माळीवाडा, माणिकचौक, आनंदीबाजार, जुने मनपा कार्यालय परिसर, पंचपीर चावडी, बालिकाश्रम रोड कार्यालय परिसर, पंचपीर चावडी, बालिकाश्रम रोड परिसर, स्टेशनरोड, विनायकनगर, आगरकर मळा व सावेडी इत्यादी भागातील पाणीपुरवठा हा बुधवार ऐवजी गुरुवारी (दि. २३) करण्यात येईल.या काळात पाण्याचा वापर काटकसरीने करून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त शंकर गोरे यांनी केले आहे.
ताजी बातमी
बिहारमध्ये पुन्हा ‘नितीश सरकार’ नितीश कुमारांनी १० व्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ
विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर बिहार एनडीएने नवीन सरकार स्थापन केले. जदयूचे नेते नितीश कुमार यांनी १०...
अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध, २७ नोव्हेंबरपर्यंत हरकती
अहिल्यानगर - अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी विधानसभेच्या मतदार यादीच्या आधारे तयार केलेल्या मतदार याद्या महाराष्ट्र...
राज्य शासनाच्या युवा धोरण समितीवर आमदार संग्राम जगताप यांची निवड
अहिल्यानगर : राज्य शासनाच्या युवा धोरणसमितीवर आमदार संग्राम जगताप यांची निवड झाली असून शालेय शिक्षण व क्रीडा...
चर्चेत असलेला विषय
अनैतिक संबंधाच्या संशयातून पुजाऱ्यानेच केला मित्राचा खून:
नारायणगाव: आरोपी वरसावने गावाजवळ डोंगररांगात लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
या प्रकरणातील आरोपील अटक करण्यात आलीय
नात्यातील...
फ्लाइट अटेंडेंट ने किया प्लेन में ऐसा स्टंट, देखने वाले रह गए हक्के-बक्के
सोशल मीडिया पर एक अमेरिकन महिला फ्लाइट अटेंडेंट का वीडियो खूब देखा जा रहा है। इसमें वह अपनी एरोबेटिक स्किल्स की मदद...
अहमदनगर कोरोना अपडेट शनीवार दिनांक : १९/९/२०२० आज दिवसभराचा अहवाल
अहमदनगर कोरोना अपडेट शनीवार दिनांक : १९/९/२०२०आज दिवसभराचा अहवाल
आजपर्यंत ३१,१९१ रुग्ण कोरोनामुक्त.आजपर्यंत ३६,११५ रुग्णांची नोंद.सध्या ४,३३८ रुग्ण उपचार...
दिल्लीतील 20 कोटी रुपयांच्या दागिन्यांची चोरी: पोलिसांनी कसा शोध लावला, संशयितांना अटक केली
एका ३१ वर्षीय व्यक्तीने रविवारी उशिरा जंगपुरा येथील एका दागिन्यांच्या दुकानात घुसून २० कोटी रुपयांचे सोन्याचे आणि...






