शहरात सात वर्षीय मुलीवर झालेल्या अत्याचाराचा निषेध नोंदवून नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी

480
  • विश्व मानवाधिकार परिषदेच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी यांना निवेदन. अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात घडलेल्या सात वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याचा निषेध नोंदवत नराधमास फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी विश्व मानवाधिकार परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे अप्पर जिल्हाधिकारी सोनाप्पा यमगर यांना निवेदन देताना विश्व मानवाधिकार परिषदेचे युवक प्रदेशाध्यक्ष नावेद शेख, प्रदेश सचिव सय्यद शफीबाबा, जिल्हा अध्यक्ष अज्जू शेख, अल्पसंख्यांक अध्यक्ष अल्ताफ शेख, जिल्हा उपाध्यक्ष शहानवाज शेख, शहराध्यक्ष अरुण कोंडगे, सनाउल्ला खान आदी उपस्थित होते. शहरातील काटवण खंडोबा परिसरातील एका मंगल कार्यालयात वॉचमन म्हणून काम करणाऱ्या आरोपीने गरीब मजुरी करणाऱ्या कुटुंबातील लहान चिमुकली खेळत असताना गाडीवर बसून मंगल कार्यालयाच्या आडोशाला नेऊन तिच्यावर अत्याचार केला. व ही बाब कोणास सांगितले तर जिवे मारण्याची धमकी दिली. अशा नरारामास फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच अत्याचाराचे अनेक घटना दिवसेंदिवस घडत आहे. अशा प्रवृत्तीच्या गुन्हेगारांमध्ये कायद्याची भीती नसल्याने अशा विविध घटना समोर येत आहे. अशा घटनांना थांबवण्यासाठी सरकारने कायदा व सुव्यवस्था वर लक्ष द्यावे आणि अशा नराधमांना मृत्युदंड सारखा कठोर कायदा अमलात आणावे जेणेकरून असले अमानुषकृत्य कुणी करणार नाही. जोपर्यंत नराधमांना फासावर लटकवले जाणार नाही. तोपर्यंत हे अत्याचाराच्या घटनांवर आळा बसणार नसल्याचे निवेदनात म्हटले असुन लवकरात लवकर अशा नराधमांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here