शरद पवार होणार पंतप्रधानपदाचे उमेदवार? ‘युपीए’ अध्यक्षपदासाठी विचारणा

शरद पवार होणार पंतप्रधानपदाचे उमेदवार? ‘युपीए’ अध्यक्षपदासाठी विचारणा
नवी दिल्ली : भाजपचा वारु रोखण्यासाठी महाराष्ट्रात शिवसेना व कॉंग्रेसला सोबत घेत सत्ता स्थापन करण्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे आता देशपातळीवरही पवारांच्याच नेतृत्वात राष्ट्रीय स्तरावरही अशाच प्रकारे विरोधी पक्षांशी मोट बांधली जावी, यासाठी कॉंग्रेसने गळ घातली असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे शरद पवारांना पंतप्रधानपदाचा उमेदवार करण्याचीही त्यांची तयारी असून त्याची सुरुवात पवारांनी युपीएचे अध्यक्षपद स्विकारुन करावी, अशी विचारणा करण्यात आल्याची चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात होत आहे. काही वृत्तवाहिन्यांनी याबाबतचे वृत्त दिले आहे.  शरद पवार यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रासारखी महाविकास आघाडी केंद्रीय स्तरावर करण्याची मागणी केली जात आहे. कॉंग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी या संबंधीचा प्रस्ताव शरद पवार यांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विरोधी पक्षाला एकत्र करुन आगामी लोकसभा निवडणुकीचं नेतृत्व करावं, असा प्रस्ताव कॉंग्रेसने दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here