शरद पवार हेच महाराष्ट्राच्या राजकारणातील बाप…

आमदार अमोल मिटकरींचे चंद्रकांत पाटलांना सणसणीत प्रत्युत्तर

मुंबई  शरद पवार हेच महाराष्ट्राच्या राजकारणातील बाप आहेत. 2019 विधानसभा निवडणूकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर शरद पवार यांनी भाजपच्या 105 आमदारांना बेकार करून महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. तेव्हाच बाप कोण आहे, हे सिध्द झाले आणि हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे, असे सांगत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांना सणसणीत प्रत्युत्तर दिलं.

दरम्यान, महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. पुण्यामध्ये आयोजित एका पक्षांतर्गत कार्यक्रमावेळी बोलताना पाटील यांनी, “पुणे महापालिकेतील सत्तेबाबत अजित पवारांना जर काही स्वप्न पडत असतील तर यासंदर्भात ऊर्जा वायाला घालवू नका आम्ही पण तुमचे बाप आहोत,” अशा शब्दांमध्ये अजित पवार यांना टोला लगावला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here