शरद पवार साक्ष देण्यासाठी भीमा कोरेगाव आयोगापुढे उपस्थित राहणार
मुंबई :भीमा कोरेगाव इथं घडलेल्या हिंसचाराची चौकशी करणाऱ्या जे. एन. पटेल आयोगासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार पवार साक्ष देणार आहेत. सकाळी साडेदहा वाजता शरद पवार आयोगासमेर साक्ष देणार असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी शरद पवारांनी आपलं अतिरिक्त प्रतिज्ञापत्रही नुकतंच आयोगापुढे सादर केलं आहे. मलबार हिल येथील सह्याद्री अतिथीगृहातील आयोगाच्या दालनात पवार यांची चौकशी होणार आहे.