
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. नवीन प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे यांची नियुक्ती निश्चित मानली जात आहे. शिंदे मंगळवारी प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्विकारणार आहेत.





