अहमदनगर । प्रतिनिधी
अहमदनगर जिल्ह्यातली गुन्हेगारीची आकडेमोड पाहता विविध प्रकारच्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढते आहे. या पार्श्वभूमीवर एकट्या गुन्हेगाराला भादंवि कलम ५५ नुसार तडीपार करण्याचे अधिकार जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहेत. मात्र खुनाची सुपारी घेऊन ‘क्राईम’ करणार्या व्यावसायिक टोळ्याविरुध्द ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांनी आज दिले.
ते आज (दि. २६) अहमदनगर दौर्यावर आले होते. त्यानिमित्त पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड उपस्थित होते.
विशेष पोलीस महानिरीक्षक दिघावकर ते म्हणाले, आजच्या दौर्यात पार पडलेल्या बैठकीत विविध विषयांवर अधिकार्यांशी चर्चा झाली.
जिल्ह्यातल्या विविध पोलीस ठाण्यांतल्या अधिकार्यांच्या नजरेतून अहमदनगर जिल्हा पाहता आला. दिवसेंदिवस गुन्हेगारीचे स्वरुप बदलत चालले आहे.
चोर्या, जबरी चोर्या, घरफोड्या, खून, खुनाचा प्रयत्न याबरोबरच नोकरीचे प्रलोभन दाखवून तरुणांची फसवणूक, व्यापार्यांकडून शेतकर्यांची आर्थिक फसवणूक,
सायबर क्राईमंतर्गत गरजवंतांना फायनान्सचे आमिष दाखवून लुटण्याचे प्रकार वाढले आहेत. यावर लवकरच विशेष अशी मोहिम हाती घेणार आहोत.
लाॅकडाऊनच्या कालावधीत कौटूंबिक हिंसाचाराच्या गुन्ह्यांत घट झाली आहे. मात्र गुन्हेगारीमध्ये जळगाव जिल्ह्याचा एक तर अहमदनगर जिल्ह्याचा दुसरा क्रमांक लागतो.
लाॅकडाऊनच्या अहमदनगरवासियांनी सर्व सण आणि उत्सव शांततेत साजरे केल्याबद्दलअहमदनगरची जनता अभिनंदनास पात्र आहे.
खासगी फायनान्स कंपन्यांकडून सक्तीची वसूली होत असल्यास संबंधितांच्या लेखी तक्रारीनुसार कारवाई करण्यात येईल. मात्र त्यांची वसूली जर नियमानुसार असेल पोलीस काहीच करु शकणार नाहीत.
त्यासाठी या फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेतलेल्या कर्जदारांनी त्या कर्जाची परतफेड करण्याची तयारी करावी. मात्र विनाकारण त्रास अथवा आर्थिक फसवणूक अजिबात सहन केली जाणार नाही’.
दुचाकीचोरींवर ‘आयजीं’ची अशी शक्कल!
या पत्रकार परिषदेत काही पत्रकारांनी दुचाकीचोरीचा मुद्दा उपस्थित करत या गुन्ह्याच्या प्रलंबित असलेला तपास आणि उपाययोजनेसंदर्भात विशेष पोलीस महानिरीक्षक दिघावकर यांना प्रश्न विचारले.
त्यावर ते म्हणाले, ‘पूर्वी लोक सायकलला कुलूप लावायचे. मात्र आता मोटारसायकलला कुलूप लावत नाही. हल्ली एका घरात तीन दुचाकी वाहने आली.
मात्र या दुचाकीस्वारांनी ती लावतांना मागच्या किंवा पुढच्या चाकांमध्ये साखळी लावून तिला कुलूप लावल्यास चोरट्यांनी जरी वायरिंगमध्ये जोडजाड करुन दुचाकी चोरण्याचा प्रयत्न केला
तरी दुचाकींच्या चाकाला साखळी आणि कुलूप लावल्यास दुचाकीचोरींच्या गुन्ह्यांना आळा बसू शकेल’.