
अहमदनगर महापालिका प्रशासन
अकाेला महापालिकेच्या धर्तीवर महापालिकेचे उत्पन्न वाढवण्यासाठी अहमदनगर शहर हद्दीतील ३५५ स्वरुपाच्या व्यावसायिकांकडून वार्षिक परवाना शुल्क आकारले जाणार आहे. याबाबत स्थायी समितीने परवानगी दिली असून महासभेत विषय मंजूर झाल्यावर नव्याने शुल्क आकारण्यात येणार आहे.
या व्यावसायिकांचा समावेश
अहमदनगर शहरातील ४० हजारांपेक्षा जास्त व्यावसायिक आस्थापना आहेत. यात काही व्यावसायिकांचा समावेश हाेता. मात्र, अकाेला पॅटर्ननुसार लाकडी खोके तयार करणे, गोण्या विक्री, रद्दीचे दुकान, मातीचे भांडी, बांबू विक्री, खासगी गोडाऊन, मोबाईल, दागिने, गॅरेज आदी ३५५ व्यावसायिकांना आता यात समावेश केला आहे. त्यांच्याकडून २०० ते १५ हजार रुपयांपर्यंतचा शुल्क आकारण्यात येणार आहे.
यासाठी नव्याने शुल्क आकारणीचे फाॅर्म प्रभाग कार्यालयामध्ये उपलब्ध करून दिले जाणार आहे. परंतु, आधी आस्थापनांचे सर्वेक्षण झाल्यानंतर या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या मार्केट विभागाने दिली.