व्यापाऱ्यांना मोठं न करता शेतकरी हिताचा निर्णय घ्यावा – शरद पवार

    796

    व्यापाऱ्यांना मोठं न करता शेतकरी हिताचा निर्णय घ्यावा – शरद पवार

    नवी दिल्ली | ग्राहक संरक्षण आणि अन्न पुरवठा मंत्रालयाने कांदा निर्यात बंदी करण्याचा प्रस्ताव दिला. याच आधारावर केंद्र सरकारने निर्यात बंदीचा निर्णय घेतला आहे. यानंतर देशभरातून या निर्णयाला विरोध होत आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रियी दिलीये.

    कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोध केला आहे. शरद पवार यांनी दिल्लीत संसद अधिवेशनादरम्यान पियुष गोयल यांची भेट घेतली.

    मोठ्या प्रमाणात शेतकरी अल्पभूधारक आहे. त्यामुळे केंद्र सरकारने व्यापाऱ्यांना मोठं न करता शेतकरी हिताचा निर्णय घ्यावा, असं शरद पवारांनी म्हटलंय.

    केंद्र सरकारने आकस्मिकपणे कांद्याची निर्यातबंदी जाहीर केली. त्यावर महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक बेल्टमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली व विविध राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी माझ्याशी काल रात्री संपर्क करून केंद्र सरकारला या प्रतिक्रियेबाबत अवगत करण्याची विनंती केल्याचं शरद पवारांनी सांगितलं आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here