वेळेत फ्लॅट चा ताबा न दिल्याने काशिदा डेव्हलपर ला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा दणका:

वेळेत फ्लॅट चा ताबा न दिल्याने कशीदा डेव्हलपर ला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा दणका:

अहमदनगर : ठरलेल्या अटी व शर्ती नुसार बांधकाम एक वर्षाच्या आत पूर्ण न केल्यामुळे अहमदनगर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग यांनी शिर्डी येथील साई श्री बिल्डिंग चे डेव्हलपर श्रीकांत कोयटे ,कशिदा डेव्हलपर प्रा. लि.कोपरगाव .या विकसकावर ग्राहक संरक्षण कायदा कलम १२अंतर्गत अंतिम आदेश दिला आहे.

सदर आदेशानुसार श्रीकांत कोयटे यांनी तक्रारदार कुरेशी जावेद अहमदलाल रा. अहमदनगर यांना

१.बुकिंग पोटी घेतलेली रक्कम, संपुर्ण रक्कम मिळे पावेतो दसादशे ९ टक्के व्याजाने द्यावे.

.२.शारीरिक व मानसिक त्रासा पोटी रक्कम ₹१०,०००/- तसेच,

३. तक्रार अर्जाचे खर्चा पोटी रक्कम ₹ ५,०००/- द्यावी.अश्या प्रकार चा दंड हा झालेला आहे.

सदरचा तक्रार अर्ज हा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग अहमदनगर येथे दाखल केला होता.

तक्रारदार याच्या वतीने ॲड. श्री. ॲड. श्री.रफिक निजामभाई बेग, ॲड. रियाज आर.बेग आणि ॲड. अयाज आर.बेग यांनी काम काज पाहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here