*वेरूळ मध्ये होणार एकाच ठिकाणी देशातील 12 ज्योतिर्लिंगांच्या प्रतिकृतींची प्रतिष्ठापना.* _
मंदिराचे बांधकाम महेंद्र बापू यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु._औरंगाबादमध्ये येणाऱ्या उत्साही पर्यटक, अभ्यासक आणि भाविकांचे लक्ष वेधून घेणारे आणखी एक मंदिर वेरूळमध्ये साकारत आहे.▪️जिल्ह्यातील वेरूळ येथे देशातील सर्वात जास्त उंचीचे शिवलिंगाच्या आकारचे मंदिर बांधले जात आहे. या मंदिराच्या गाभाऱ्यात एकाच ठिकाणी देशातील 12 ज्योतिर्लिंगांच्या प्रतिकृतींची प्रतिष्ठापना होणार आहे. उज्जैन येथे या प्रतिकृती तयार करण्याचे काम सुरु आहे. एकाच वेळी 12 पिंडींना प्रदक्षिणा घालण्यासाठी विशेष मार्गही तायर करण्यात येणार आहे.▪️मंदिंराचे बांधकाम पूर्ण झाल्यावरचे दृश्य खूप नयनरम्य असेल. मंदिर पूर्णपणे काळ्या रंगाचे असेल. पावसाळ्यात भव्य शिवलिंगावर निसर्गदेवताच जणू पाण्याचा अभिषेक करेल आणि पिंडीवर पडणारे पाणी शाळुंकेतून खाली पडतानाचे दृश्य बघणाऱ्याच्या डोळ्याचे पारणे फेडणार ठरेल. ▪️मंदिराची एकूण उंची 60 फुटांची तर त्यातील पिंडाची उंची 40 फुटांची आहे. शाळुंका 38 फुटांची असेल. तसेच एकूण मंदिराचा परिसर 108 बाय 108 चौरस फूट असेल.______________________________________________________






