
पाथर्डी: (Pathardi) तालुक्यातील श्री क्षेत्र वृध्देश्वर (Vrideshwar) येथे तिसऱ्या श्रावण (Shrawan) सोमवारनिमीत्त हजारो भाविकांनी आदिनाथाच्या स्वयंभू शिवपिंडीचे दर्शनासाठी गर्दी केली होती. वृद्धेश्वर येथे येणारे बहुतांश भाविकांकडून वृद्धेश्वर(Vrideshwar) कडे भरपूर पाऊस (Rain) पडू दे व बळीराजा सुखी होऊ दे, अशी प्रार्थना केली जात होती.
श्री क्षेत्र वृध्देश्वर येथे तिसरा श्रावण सोमवारनिमीत्त यात्रा भरते. मढी, देवराई, मायंबाकडून येणारे सर्वच रस्ते गर्दीने फुलून गेले होते. घाटशिरस पासून वृद्धेश्वर कडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाल्याने भाविकांनी नाराजी व्यक्त केली. पोलीस प्रशासनाच्यावतीने डीवायएसपी प्रवीण पाटील, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता. देवस्थान समितीने दर्शन रांगेचे योग्य नियोजन केल्याने गर्दी झाली नाही.
उन्हाची तीव्रता जाणू नये म्हणून भाविकांसाठी संपूर्ण मंदिर परिसरात मंडप उभारण्यात आला होता. माजी मंत्री शिवाजी कर्डिले, देवस्थान समितीचे अध्यक्ष गणेश पालवे यांच्या उपस्थित महापूजा पार पडली. घाटशिरस ग्रामस्थ व भाविकांनी पैठणवरून आणलेल्या कावडीच्या पाण्याने स्वयंभू शिवपिंडीला जल अभिषेक केला. तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त येथे रक्तदान शिबिर तसेच आरोग्य विभागाकडून देखील भाविकांसाठी सुविधा दिल्या जात होत्या. वृद्धेश्वर येथे आलेल्या भाविकांसाठी वृद्धेश्वर देवस्थान, चालक-मालक संघटना, जय महाकाल सेवा मंडळ यांच्या वतीने खिचडी, केळी, चहाचे मोफत वाटप करण्यात आले.