विराटवर डाव उलटला..! उपकर्णधार पदावरुन रोहितला काढण्याचा प्लॅन फसला
विराट कोहली याने टी-20 संघाचे कर्णधारपद सोडण्याच्या घोषणा केल्यावर टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये सगळं काही आलबेल नसल्याचे समोर येतंय. वनडे, टी -20 संघाच्या उपकर्णधारपदावरून रोहित शर्माला हटविण्यासाठी विराटने प्रयत्न केल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
??♂️ रोहितला उपकर्णधारपदावरून हटविण्यासाठीचा प्रस्ताव घेऊन विराट हा निवड समितीकडे गेला होता. रोहित 34 वर्षांचा झालाय. त्यामुळे के.एल. राहुलला वनडेचा उपकर्णधार, तर टी -20 मध्ये रिषभ पंतला कर्णधार करावे, असे विराटचे म्हणणं होतं. आपले मत त्याने बीसीसीआयसमोर ठेवलं होतं.
? दरम्यान, विराटचा हा डाव त्याच्यावरच उलटला. कारण, आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचे रोहितने केलेले नेतृत्व समोर आहे. बीसीसीआयने रोहितमधील नेतृत्वगुण हेरले होते. त्यामुळे विराटची डाळ शिजली नाही आणि त्याचा प्लॅन त्याच्यावरच उलटला.
?️ बोर्डाला विराट कोहलीचा हा निर्णय अजिबात आवडला नाही. त्यांनी त्याचा हा प्रस्ताव नाकारला. कारण, कोहलीला खरे तर कोणीही खरा उत्तराधिकारी नको आहे, असे बीसीसीआयला वाटल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
?️ माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांनी विराट आणि बीसीसीआयमधील संबंध कमालीचे ताणले असल्याचे सांगितले. बीसीसीआय नि विराटमध्ये संवाद होत नसल्याने हा तणाव वाढल्याचे पाटील यांचे म्हणणे आहे.
➖➖➖➖➖➖➖





