विराटचे पुनरागमन फसले..! कॅप्टनला बाद देण्याच्या निर्णयावरुन वाद..!

368

भारत विरुद्ध न्युझीलंडमधील दुसऱ्या टेस्टला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आजपासून सुरुवात झाली.. कॅप्टन विराट कोहलीने या टेस्टद्वारे पुनरागमन केले. मात्र, फिरकीपटू एजाज पटेलने त्याला शुन्यावरच पायचीत बाद केले. मात्र, विराटला बाद देण्याच्या पंचांच्या निर्णयावरुन आता वाद सुरु झालाय.. मैदानावरील पंचांनी एजाज पटेलच्या बाॅलिंगवर विराटला पायचीत बाद दिले. पंचाच्या निर्णयाला आव्हान देताना विराटने डीआरएस घेतला. रिप्लेमध्ये चेंडू त्याच्या बॅटला आणि पॅडला एकाच वेळी लागल्याचे दिसत होते. त्यामुळे टीव्ही अंपायरनेही मैदानावरील पंचांचाच निर्णय कायम ठेवला.. पंचांच्या निर्णयावर विराट समाधानी नव्हता. पॅव्हेलियनमध्ये परतताना त्याने आपला राग व्यक्त केला. सीमा रेषेरजवळ त्याने जोरात बॅट आपटली. सोशल मीडियावरही नेटिझन्सनी पंचांच्या निर्णयाबाबत संताप व्यक्त केला. टीव्ही समालोचकांनीही या निर्णयाबाबत आश्चर्य व्यक्त केले.*मयांकचे शानदार शतक*दरम्यान, टाॅस जिंकून प्रथम बॅटिंग करताना, टीम इंडियाचे शुभमन गिल व मयांक अग्रवाल यांनी चांगली सुरुवात करुन दिली. मात्र, संघाच्या 80 धावा झालेल्या असताना गिल (44) बाद झाला. नंतर पुढच्याच षटकात चेतेश्वर पुजारा (0) नि कोहली (0) बाद झाल्याने टीम इंडिया अडचणीत आली होती. मयांकने (नाबाद 120) सुरुवातीला श्रेयस अय्यर (18) व नंतर वृद्धीमान साहा (नाबाद 25) यांना जोडीला घेत भारताचा डाव सावरला. पहिल्या दिवसअखेर टीम इंडियाने 4 बाद 221 धावा केल्या आहेत.. न्युझीलंडच्या एजाज पटेलने भारताच्या सगळ्या 4 विकेट घेतल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here