विभागीय लोकशाही दिनाचे 9 ऑगस्ट रोजी आयोजन
नाशिक दि. 6 ऑगस्ट 2021 (विमाका वृत्तसेवा):
विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक रोड येथे 9 ऑगस्ट 2021 रोजी दु. 1.00 वाजता विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आलेले आहे, असे उपायुक्त (महसूल) गोरक्षनाथ गाडीलकर यांनी एका शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
शासकीय प्रसिध्दी पत्रकात नमुद केल्यानुसार, शासनाने 2 ऑगस्ट, 2021 च्या आदेशान्वये कोविड-19 च्या फैलावास प्रतिबंध करण्यासाठी राज्यातील काही जिल्ह्यात निर्बध व सुचना निर्गमित केल्या आहेत. सदर आदेशान्वये नाशिक विभागातील अहमदनगर जिल्ह्यात निर्बंध लागू असून इतर जिल्ह्यांत निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. त्यामुळे विभागीय लोकशाही दिन दहा विभागप्रमुख यांचे उपस्थित आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहितीही उपायुक्त (महसूल) गोरक्षनाथ गाडीलकर यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.***





