विभागीय आयुक्तांनी घेतला मदत, पुनर्वसन कार्याचा आढावा

614

अकोला,दि.३०(जिमाका)-जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे झ्गालेल्या नुकसानीनंतर जिल्ह्यात सुरु असलेल्या मदत पुनर्वसन कार्याचा आढावा आज विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत त्यांनी आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, कार्यकारी अभियंता पाटबंधारे वाकोडे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते. यावेळी विभागीय आयुक्त सिंह यांनी जिल्ह्यात झालेले शेतीचे नुकसान, विमाधारक शेतकऱ्यांची संख्या, त्यांचे झालेल्या पंचनाम्याचे प्रमाण, पिक निहाय झालेले नुकसान, घरांची पडझड, जिल्ह्यात सुरु झालेले सानुग्रह अनुदान वितरण याबाबत यंत्रणेकडून माहिती घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here