विकसित महाराष्ट्र आणि विकसित भारताच्या दिशेने मार्गक्रमण…

    80

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता फडणवीस यांच्यासह आज मुंबई येथे भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर विविध देशांच्या वाणिज्य दूतांसोबत आयोजित ‘स्नेहभोजन’ कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती दर्शवली.

    यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, गेल्या 10 वर्षांत भारताने जगातील 11 व्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेवरुन चौथ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेकडे झेप घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेली ही वृद्धी सर्वसमावेशक असून, अवघ्या एका दशकात 25 कोटी लोक गरिबी रेषेबाहेर आले आहेत. जागतिक दर्जाचे रस्ते, बंदरे आणि विमानतळ उभारणीसह तंत्रज्ञान क्षेत्रातही भारताने आपले भक्कम स्थान निर्माण केले आहे. ‘आंतरराष्ट्रीय सौर आघाडी’सारख्या उपक्रमांद्वारे भारत जगाला शाश्वत विकासाच्या मार्गाशी जोडत आहे.

    या प्रवासात महाराष्ट्र हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा ‘पॉवरहाऊस’ म्हणून अग्रस्थानी राहिला आहे. परकीय गुंतवणुकीत देशातील जवळपास 40% वाटा महाराष्ट्राचा असून, जागतिक गुंतवणूकदारांचा विश्वास मिळवण्यात राज्य यशस्वी ठरले आहे. महाराष्ट्र आज देशाची ‘स्टार्टअप कॅपिटल’ असून, सर्वाधिक स्टार्टअप्स आणि युनिकॉर्न्स महाराष्ट्रामध्ये आहेत.

    मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, जगातील विविध देशांशी भागीदारी अधिक बळकट करण्यासाठी हा योग्य काळ आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आपण ‘विकसित भारत’ आणि ‘विकसित महाराष्ट्र’ घडवण्याचा संकल्प करण्याचे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

    उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, मंत्री जयकुमार रावल आणि विभिन्न देशाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here