वाहन धारकांसाठी आनंदाची बातमी

965

?

COVID_19 च्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक वाहतूक व मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना १ एप्रिल ते ३० सप्टेंबर २०२० या कालावधीसाठी वाहन करमाफी. याचा ११ लाख ४० हजार ६४१ वाहनांना लाभ होणार, तर शासनावर ७०० कोटींचा भार पडणार- परिवहन मंत्री

वाहन धारकांसाठी आनंदाची बातमी? मागील सहा-सात महिन्यांपासून कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशातील अनेक उद्योगधंदे बंद असल्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोटार वाहनांशी संबंधित फिटनेस, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आरसी, पॉल्युशन सर्टिफिकेट यासारख्या वाहनांच्या वैधतेची मुदत ३१ डिसेंबर २०२० पर्यंत वाढवली आहे. त्यामुळे वाहनधारकांना मुदत संपत असलेल्या वाहनांच्या कागदपत्रांचे नविनीकरण करण्यासाठी वेळ मिळणार आहे.

मोटार वाहनाशी संबंधित कुठल्याही कागदपत्रांची मुदत संपली असेल तर त्यासाठी आता केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे वाहनधारकांना चिंता करावी लागणार नाही. ३१ डिसेंबरपर्यंत तुम्ही अशा कागदपत्रांचे नुतनीकरण करून घेऊ शकता.त्याचबरोबर सरकारने मुदत संपत असलेल्या ड्रायव्हिंग लायसन्ससाठीची वैधतासुद्धा ३१ डिसेंबरपर्यंत २०२०पर्यंत वाढवण्यात आली आहे.

लॉकडाऊनदरम्यान एका आदेश जारी करून केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मुदत संपलेले ड्रायव्हिंग लासयन्स, आरसी, फिटनेस सर्टिफिकेट, परमिट आणि अन्य कागदपत्रांची वैधता ३० जून २०२० पर्यंत वाढवली होती. पण परिस्थितीत जून महिन्यापर्यंत फार सुधारणा न झाल्यामुळे ही मुदत ३० सप्टेंबरपर्यंत वाढवली गेली होती. या मुदतीमध्ये सरकारने आता तिसऱ्यांदा वाढ करून ती डिसेंबर २०२० पर्यंत वाढवली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here