वारंवार ऍसिडिटी होतेय?

आजकाल अगदी लहानमुलांपासून ते वृद्ध माणसांपर्यंत कोणालाही ऍसिडिटी होताना दिसते . खाण्यापिण्याच्या बदललेल्या सवयी आणि वेळा तसेच मानसिक ताणात होत असलेली वाढ यामुळे ऍसिडिटी चे विकारही वाढले आहेत .
ऍसिडिटी वर आजकाल बाजारात अनेक अँटासिड गोळ्या उपलब्ध आहेत . मात्र त्याच्या ऐवजी घरच्याघरीच काही रोजच्या वापरातले पदार्थ वापरूनही त्यावर नियंत्रण मिळविता येते .

बघुया काही घरगुती उपाय …

घरगुती उपचारात 1/4 चमचा ज्येष्ठमध पावडर दूध अथवा पाण्यातून दिवसातून दोन वेळा तीन दिवस घेण्याने ऍसिडिटी चा त्रास कमी होतो .

अमसूल सरबत प्यायल्याने ही ऍसिडिटी कमी होते .

गार वारे लागल्यामूळे अंगावर येणाऱ्या पित्ताला शैतपित्त म्हणतात . या पित्तावर खायचा सोडा कोरडाच अंगाला लावून अर्ध्या तासाने आंघोळ करावी म्हणजे हा त्रास कमी होतो .

ऍसिडिटी कमी करण्यासाठी गार केलेले दूध भरपूर साखर घालून थोडे थोडे वारंवार प्यायल्यास पित्तामुळे पोटात अथवा छातीत होणारी जळजळ कमी होते . दूध गार करण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवले तरी चालते . बाजारात सूतशेखर मात्रा मिळते . पित्तावर ही मात्रा उगाळून दुधातून घेतल्यासही आराम मिळतो .

ऍसिडिटी होणाऱ्या उलट्या थांबविण्यासाठी दूध आणि घरातील फ्रिजमध्ये तयार केलेला चांगल्या पाण्याचा बर्फ एकत्र करून प्यायल्यास उलट्या कमी होतात .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here