वानवडीत हिंदू- मुस्लिम विवाह एकाच मंचावर…

    87

    वानवडीत काल सायंकाळी मुसळधार पाऊस झाला. घोरपडी मधील चेतन कवडे यांच्या मुलीच्या लग्नाच्या वेळी अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला, अलंकरण लॉन मध्ये लग्न लावणे शक्य नव्हते. शेजारच्या हॉलमध्ये मुस्लिम नवविवाहित जोडप्याचे रिसेप्शन सुरू होते, पावसाच्या परिस्थितीत काजी परिवाराने मदत केली, लॉन ऐवजी हॉलमध्ये हा विवाह सोहळा पार पडला. खरंतर जात-धर्मापेक्षा माणुसकी महत्त्वाची असते आणि त्याचे दर्शन काल घडले.

    Pune Latest Marathi News: माणसाने जातीच्या,धर्माच्या भींती निर्माण केल्या, मात्र निसर्ग खऱ्या अर्थाने सहिष्णू असतो. निसर्गाच्या साक्षीने दोन धर्मियांचा अनोखा जिव्हाळा मंगळवारी दिसून आला. पुण्यात एका विवाह सोहळ्यादरम्यान मुसळधार पाऊस आला.. सर्वत्र पळापळ झाली. मात्र जवळच मुस्लिम रिसेप्सश सोहळा सुरु होता. तिथेच मग हिंदू विवाह पार पडला.

    त्याचं झालं असं की, मंगळवार, दि. २० मे रोजी सायंकाळी ६ वाजून ५६ मिनिटांनी पुण्यातील वानवडी येथे एक लग्नसोहळा आयोजित करण्यात आलेला होता. एसआरपी ग्राऊंड, अलंकार लॉन्स येथे हा विवाह सोहळा होणार होता. मात्र मंगळवारी पुण्यात तुफान पाऊस बरसत होता. लग्नाच्या वेळी पावसाने जोर धरला आणि पाहुणे आडोश्याला पांगले. मुहूर्त जवळ आला पण खुलं पाटांगण असलेल्या विवाहस्थळी गोंधळ पूर्ण उडाला होता.

    सुदैवाने नजीकच्या एका हॉलमध्ये मुस्लिम नवविवाहितांचे रिसेप्शन सुरु होते. बाका प्रसंग आल्यामुळे हिंदू विवाह सोहळ्यातील वडिलधाऱ्या मंडळींनी त्या मुस्लिम परिवारातील नातेवाईकांकडे विनवणी केली. त्यांनी कसलेही आढेवेढे न घेता दीड तासांसाठी त्यांचा मंच उपलब्ध करुन दिला. त्यामुळे चि. सौ. कां. संस्कृती आणि चि. नरेंद्र यांचा विवाह सोहळा सुखरुप पार पडला.

    मंगलाष्टक झाल्या, विवाहाच्या सगळ्या विधी उरकल्या, दोन्ही धर्मियांच्या एकत्रित पंगतीही उठल्या. विशेष म्हणजे दोन्ही जोडप्यांनी एकत्रित फोटोही काढले. अचानक आलेल्या पावसामुळे लग्न सोहळा व्यवस्थित पार पडतो की नाही, असा प्रश्न कवडे आणि गलांडे पाटील कुटुंबियांपुढे होता. मात्र मुस्लिम रिसेप्शन सोहळ्यातील नातेवाईकांनी साद दिल्याने सर्वकाही सुखरुप पार पडले.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here