
शेवगाव तालुक्याच्या आणि अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारण आणि समाजकारणातील एक दमदार व्यक्तिमत्व तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसची बुलंद मुलूख मैदानी तोफ स्व. पक्षासह विरोधी पक्षातही आपले मित्र बाळगणारे भल्या भल्या राजकारण्यांना राजनैतिक मोलाचा सल्ला देणारे राजकारण करताना जिथे अनेकांची बुद्धी बंद पडते तिथून आपले विचार सुरु करणारे जोहरापूर गावचे सरपंच ते जिल्हा परिषद अहमदनगर चे सभापतीपद अशी विविध पद भूषवतांना गोरगरीब सर्वसामान्य शेतकरी काबर कष्ट करणारे यांच्यासाठी आपले जीवन वाहून घेणारे सध्या भरकटलेल्या महाराष्ट्रातील राजकारणामध्ये आपल्या विचारांचा भक्कम पाया घेऊन वेळप्रसंगी कठोर निर्णय घेऊन आपले राजकारण आणि समाजकारण याच्याशी कुठलीही तडजोड न करता ज्यांनी तालुक्यातील गावागावांमध्ये अनेक तरुण कार्यकर्ते तयार केले राजकारणातील बारीक-सारीक गोष्टी आपल्या कार्यकर्त्यांना शिकविल्या असे तालुक्यातील राजकारणातील भीष्माचार्य मा दिलीप भाऊ आपल्या हातून अशीच उत्तरोत्तर लोकसेवा आणि समाजसेवा घडो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
ताजा कलम
एखाद्या कार्यकर्त्यांनी सोसायटी ग्रामपंचायत अथवा इतर कुठल्याही निवडणुकीत फॉर्म भरला असता तो निवडून येणार की पडणार आणि किती निवडून येणार का पडणार आणि किता मतांनी निवडून येणार असा अचूक अंदाज बांधणारे आमच्यासारख्या हजारो सर्वसामान्य कार्यकर्त्यांची अशा स्थान आणि प्रेरणास्थान दिलीप भाऊ सिर्फ नाम ही काफी है….




