!!!वर्षानुवर्षे ज्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी शेवगावकरांना झुलवले आणि आता आंदोलनापासून हातचं राखून वागत आहेत त्यांची भविष्यात चांगलीच पंचायत होणार आहे!!!
शेवगाव नगर परिषदेचे रखडलेली पाणी योजना संदर्भात सामाजिक कार्यकर्ते प्रेमसुख जाजू आणिN सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते नेते आणि कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत दिले उपोषणाचे निवेदन
{ अविनाश देशमुख शेवगाव }
9960051755
याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव नगरपरिषद नियोजित पाणीपुरवठा योजना वर्क ऑर्डर देऊन सहा महिने झालेले असताना सुद्धा प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही याबाबत त्वरित नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पाणीपुरवठा योजनेचे कन्सल्टंट योजनेचे ठेकेदार आणि नगरपरिषद शेवगाचे पाणीपुरवठा अभियंता या सर्वांची जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी 5 डिसेंबर रोजी मीटिंग आयोजित केली असून यावेळी निवेदन करते यांची संयुक्त बैठक आयोजित केली असून रखडलेल्या पाणी योजनेमध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करून संबंधित पाणी योजनेचे त्वरित काम सुरू करण्याचे आदेश देण्याची आश्वासन दिले आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते श्री प्रेमसुख जाजू भारतीय जनता पार्टीचे अरुण भाऊ मुंडे माजी नगरसेवक अशोक शेठ आहूजा कमलेश शेठ गांधी कैलास तिजोरे अजय बारस्कर दिगंबर काथवटे अंकुश कुसळकर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दत्ता भाऊ फुंदे सामाजिक कार्यकर्ते अविनाश देशमुख एजाज भाई उर्फ बाबु सय्यद राहुल उर्फ टिंकू बंब भूषण देशमुख केदारनाथ तोतला संबंधित निवेदनावर येत्या दहा दिवसांमध्ये तोडगा न निघाल्यास शेवगाव तहसील कार्यालय समोर सामाजिक कार्यकर्ते प्रेमसुख जाजू शेवगाव शहरातील विविध सामाजिक संघटना व सर्व राजकीय पक्ष व सर्वसामान्य शेवगावकर नागरिक मोठ्या प्रमाणात तहसील कार्यालय समोर बेमुदत उपोषण व शहर बंद करून मोठ्या प्रमाणात आंदोलन उभारणार असल्याचे प्रेमसुख जाजू यांनी पत्रकार परिषदेत सांगितले या आंदोलनामध्ये होणाऱ्या परिणामास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील असे सांगितले
ताजा कलम
मागील आठवड्या मध्ये सामाजिक कार्यकर्ते प्रेमसुख जाजू यांच्या निवासस्थानी झालेल्या आंदोलनाच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर अनेक माजी नगरसेवक हजर होते परंतु राजकीय दबावामुळे त्यांचे “आधे इधर जाओ आधे उधर जाव बाकी के मेरे पीछे आव” असा पचंबा झाला आपण फोटोमध्ये यायला नको म्हणून अनेक जण गायब झाले
{ क्रमशः }
येत्या आठ-दहा दिवसांमध्ये शेवगाव शहराचा पाणी प्रश्न मार्गी लागला नाही तर गेल्या अनेक वर्षापासून वैतागलेले शेवगावचे नागरिक त्रिव्र स्वरूपाच्या आंदोलन करणार आहेत
अविनाश देशमुख शेवगांव
सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार