दुबई : यंदाच्या आयपीएल मध्ये महत्वाच्या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबने सलग ६ सामने गमावले असून, पंजाब आपली खेळी सुधारून सलग विजय मिळवत आहे. आयपीएल च्या सुरुवातीस पंजाब संघासाठी बराच संघर्ष करावा लागला या संघर्षानंतर पंजाब पॉईंट टेबल मध्ये आता चौथ्या क्रमांकावर आली आहे.
याचदरम्यान सोमवारी झालेल्या सामन्यात पंजाब विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामन्यादरम्यान मंदीप सिंगने पंजाबला विजयी करताना नाबाद अर्धशतक केले, मंदीपने आपले हे अर्धशतक आपल्या वडिलांना समर्पित केले आहे. तीन दिवसांपूर्वीच मंदीपच्या वडिलांचे निधन झाले होते. मात्र तरीही त्याने आपल्या संघासाठी योगदान दिले.
‘माझे वडील नेहमी म्हणायचे कि, नाबाद खेळी करता अली पाहिजे’, अशी प्रतिक्रिया मंदीपने सामान्यानंतर दिली आणि हे अर्धशतक त्याने आपल्या वडिलांना समर्पित केले आहे. मंदीपच्या या जस्ब्याला संपूर्ण क्रिकेट चाहते सलाम करत आहेत.




